मुखेड तालुक्यात अवैध तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ७ आरोपी निष्पन्न, २.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

[ads1]

बारहाळी (प्रतिनिधी) –  नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार अवैध धंद्याविरुद्ध राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत देगलूर उपविभागीय पोलीस अधिकारी आणि मुक्रामाबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे. मुखेड तालुक्यातील मौजे बारहाळी येथील एका घरात सुरू असलेल्या बेकायदेशीर तिरट नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या पथकाने १३ सप्टेंबर २०२६ रोजी छापा टाकला.

जप्त केलेला मुद्देमाल – एकूण किंमत ₹ २,१०,६००/-:

गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून आणि आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

  • रोख रक्कम: ₹ ३०,६००/-
  • मोबाईल फोन: विविध कंपन्यांचे ७ मोबाईल, अंदाजे किंमत ₹ ८०,०००/-
  • वाहने: २ मोटारसायकली, क्रमांक MH-26-BR-0925 व MH-22-W-5649, अंदाजे किंमत ₹ १,००,०००/-
  • इतर साहित्य: बदक छाप जुगाराचे पत्ते

आरोपींची नावे व माहिती:

या प्रकरणी मुक्रामाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १४८/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमातील कलम १२ अ, ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्पन्न व ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत: 

१. गणपतराव गुंगेवाड – वय ३० वर्ष, रा. जाफराबाद/बारहाळी, ता. मुखेड 

२. रामदास विश्वनाथ विभुते – वय ३५ वर्ष, रा. बिटाळी, ता. मुखेड 

३. विनोद नामदेव पवार – वय ३९ वर्ष, रा. लखमापूर तांडा, ता. मुखेड 

४. केशव मनू चव्हाण – वय ४० वर्ष, रा. सुखवाडी, ता. मुखेड 

५. बालाजी तिरुपती – रा. पैसमाळ, ता. मुखेड 

६. बालाजी किंशन राठोड – वय ३० वर्ष, रा. लखमापूर, ता. मुखेड 

७. माधव काळबा वाघमारे – रा. बारहाळी, ता. मुखेड – फरार

पोलीस पथक व आवाहन:

सदर यशस्वी कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार व देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजू चव्हाण, पोउपनि मोरे, तसेच पोलीस अंमलदार महिनकर, गंगावरे, लुंगारे, ढगे, मुदीराज, मोटरगे व मारगोड, सर्व नेमणूक मुक्रामाबाद पोलीस ठाणे यांच्या पथकाने पार पाडली.अवैध जुगार, मटका व इतर बेकायदेशीर हालचालींवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

 


Post Views: 101










[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *