Satpur Police Outpost Tension: Mob Attacks Accused in Minor Girl Harassment Case | सातपूरमध्ये मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणात तरुणालाही दिला चोप: जमावाकडून पोलिसाचे पिस्तूल घेण्याचा प्रयत्न, अंगावरही धावले – Nashik News
![]()
एक तरुणाने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या रागातून जमावाने तरुणाला बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. याच संतप्त जमावाने पोलिस चौकीमध्ये घुसून संशयितावर हल्ला करण्याचा तसेच पोलिस कर्मचाऱ्याचे पिस्तूल हिसकवण्याचा प्रयत्न करत वरिष्ठ निरीक्षकांच्
.
अंमलदार दिपक चव्हाण यांच्या तक्रारीनुसार सातपूर येथील हिंदी शाळेजवळ मुलीची छेडछाड केल्याचा त्यांना ११२ हेल्पलाईन वर कॉल आला.घटनास्थळी जमावाकडून एक तरुणाला बेदम मारहाण सुरू होती. तरुणाला बोलकर चौकीत आणले. मुलीचे वडिल आणि त्यांच्या सहा साथीदारांनी पोलिस चौकीत आरडाओरड ‘आमच्या ताब्यात द्या त्याला मारुन टाकतो. पोलिस काय करणार असे बोलून तरुणाला पोलिसांच्या समोरच मारहाण केली. त्याचवेळी अंमलदार अमोल मोरे यांच्या कमरेला लावलेले पिस्तूल हिसकवण्याचा प्रयत्न केला. सातपूर पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक प्रकाश आहेर यांच्या अंगावर जमाव धावून गेला.
‘आती है क्या गाडी पे छोड देता हू’
संशयित मयुर पंडीत याने मुलीला ‘आती है क्या गाडी पे छोड देता हू’ असे बोलून विनयभंग केला. तो तिचा पाठलागही करत असे. सतत तीला त्रास देत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. हा सर्व प्रकार मुलीने वडिलांना हा प्रकार सांगीतला,त्यांचे नातेवाईक, मित्रांनी संशयिताला पकडून बेदम चोप दिला. ११२ हेल्पलाईन वर मदत मागीतली पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले होते.
