[ads1]
![]()
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे वतीने जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही निवडक शिक्षकांच्या गौरवार्थ कृतिशील शिक्षक पुरस्कार सोहळा आर.एल. टी. विज्ञान महाविद्यालयाचे सभागृहात आयोजित करण्यात आला. केजी टू पीजी पर्यंत अध्यापनाचे काम करणाऱ्या निवडक ६५ शिक्षकांचा कृतिशील शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करतांना माजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शिक्षकांप्रती गौरवोद्गार काढले ” शिक्षक ही केवळ एक नोकरी किंवा व्यवसाय नाही, तर ती एक साधना आहे, असे ते म्हणाले. अध्यक्षस्थानी बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतिसिंह मोहता होते. उद्घाटन माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार वसंतराव खोटरे, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, डॉ. अपर्णा पाटील, पवन माहेश्वरी, प्राचार्य डॉ. राजेश चंद्रवंशी, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश खुमकर, पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी वर्षा कल्याणकर, मुकुंद पाध्ये, डॉ. गजानन नारे, अनोश मनवर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन हिंमत ढाळे व देवेंद्र वाकचवरे यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सचिन काठोळे यांनी तर आभार कार्यवाह विजय वाकोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संतोष झामरे, किशोर चतरकर, मोहम्मद वसिमोद्दीन, दत्तात्रय सोनोने, वंदना बोर्डे, रूजिता खेतकर, गजानन शेवलकर, संतोष वाघमारे, चंद्रशेखर पेठे, नितीन बंडावार, सुनील माणिकराव, धर्मेंद्र चव्हाण, रामभाऊ मालोकार, सुनीता कोथळकर, सुरेखा जोशी, सरिता सोळंके आदींनी परिश्रम घेतले. सन्मान झालेल्या िशक्षकांनी केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला. कोरोना काळ असो वा कोणतीही कठीण परिस्थिती, तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्गम भागातील शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे काम या शिक्षकांनी केले आहे. त्यांनी शाळेला मंदिर आणि वर्गाला संस्कारांचे केंद्र बनवले.सत्कारमूर्ती शिक्षकांनो, तुमचा हा सत्कार म्हणजे तुम्ही शिक्षण क्षेत्रात पेरलेल्या विश्वासाचा आणि कष्टाचा गौरव आहे. शिवाय सेवेत कार्यरत शिक्षकांना वेगळ्या टीईटी परीक्षेसाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार याकरीता कोणत्याही स्तरावर संघर्ष करण्यासाठी मी बांधील आहे अशी ग्वाहीही डॉ. पाटील यांनी दिली. सोहळ्यात जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या जिल्ह्यातील निवडक ६५ शिक्षकांचा कृतिशील शिक्षक पुरस्कार देउन गौरव करण्यात आला. तसेच शिक्षण क्षेत्रात कार्य करणाररे मुकुंद पाध्ये यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यापन कार्यासोबतच संघटनात्मक कार्यातील अविरत योगदानासाठी शशिकांत गायकवाड, संतोष वाघमारे, मोहम्मद वसिमोद्दीन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी पतसंस्थेला प्रगतीपथावर नेण्यासाठी अध्यक्ष प्रशांत सिरसाठ यांनाही सन्मानित करण्यात आले.
[ads2]
शिक्षक ही केवळ एक नोकरी नव्हे, ती एक साधना-डॉ.रणजित पाटील:जिल्ह्यातील 65 शिक्षक कृतिशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित
















Leave a Reply