केदारनाथ यात्रा सलग तिसऱ्या दिवशी स्थगित, 500 भाविक अडकले:यूपीसह 5 राज्यांना पावसाचा अलर्ट; बिहारमध्ये 5 नद्या धोक्याच्या पातळीवर

[ads1]


ट्रेकिंग मार्गावरील चिरबासाजवळील डोंगरावरून सतत दरडी कोसळत असल्यामुळे केदारनाथ यात्रा सलग तिसऱ्या दिवशीही स्थगित ठेवण्यात आली आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तब्बल ७,००० भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढले असून त्यांना गौरीकुंडच्या दिशेने रवाना केले आहे. सध्या ५०० हून अधिक लोक तिथे अडकले आहेत. केदारनाथ धामसाठी हेलिकॉप्टर सेवा आज पुन्हा सुरू झाली असली, तरी पायी चालत जाण्याची यात्रा मात्र अजूनही स्थगित आहे. दुसरीकडे, बिहारमधील १५ जिल्ह्यांत ४९.६७ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातील पाच नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. हवामान विभागाने आज राज्यातील २२ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. हवामान विभागाने उत्तर प्रदेशातील ७२ जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. राजस्थानसाठीही १७ सप्टेंबरपर्यंत लागू राहील असा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातील बहुतांश भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. हरियाणामधील आठ जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, पंजाबमधील १८ जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता आहे. उपग्रह नकाशात मान्सूनच्या ढगांची स्थिती पहा देशभरातील हवामानाचे फोटो… देशभरातील हवामानाशी संबंधित अपडेट्स खालील ब्लॉगमध्ये वाचा…

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *