Intellectual property protection is essential for strengthening the economy: Abhay Daftardar | अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी बौद्धिक संपदा संवर्धन गरजेचे: अभय दफ्तरदार: ‘एआयसी पिनॅकल’तर्फे तिसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेचे उद्घाटन – Pune News



देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी बौद्धिक संपदेचे (Intellectual Property – IP) संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी (MSME) आयपी आणि पेटंटची नोंदणी करावी, असे आवाहन केंद्र सरकारच्या MSME मंत्रालयाचे सहायक सं

.

केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित ही दोन दिवसीय यात्रा ‘एआयसी-पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीप फोरम’ने आयोजित केली होती. या उद्घाटन सोहळ्याला एमएसएमई उद्योजक, स्टार्टअप्स, तंत्रज्ञान व्यावसायिक, कायदेविषयक तज्ज्ञ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाला पेटंट्स अँड डिझाईन्स विभागाचे सहायक नियंत्रक प्रतिक हेंद्रे, आयपीआर तज्ज्ञ वेदांत पुजारी, मॅक्लियोड फार्माच्या मानसी पाध्ये, टाटा मोटर्सचे मोहम्मद फैजल, वरिष्ठ आयपी व्यावसायिक प्रियंका कुलकर्णी, एआयसी-पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील धाडीवाल आणि व्यवस्थापक शादाब हुसेन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी तज्ज्ञांनी पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट, औद्योगिक डिझाइन आणि उद्योगाभिमुख आयपी धोरणांवर मार्गदर्शन केले.

दफ्तरदार यांनी नमूद केले की, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) एमएसएमई क्षेत्राचा वाटा सुमारे ३० टक्के आहे, तर उत्पादन क्षेत्रात ४५ टक्के आणि निर्यातीत ३५ ते ४० टक्के योगदान आहे. या महत्त्वपूर्ण योगदानाच्या पार्श्वभूमीवर, नवोन्मेष, बौद्धिक संपदा संरक्षण आणि संशोधन-विकास यांच्या माध्यमातून एमएसएमईंना सक्षम करणे गरजेचे आहे. मंत्रालयाने एमएसएमईंना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आयपीविषयी जनजागृती, सुलभ नोंदणी प्रक्रिया आणि बौद्धिक संपदेच्या व्यापारीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे.

ते पुढे म्हणाले की, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य महत्त्वाचे आहे. संशोधनातून निर्माण होणाऱ्या कल्पनांचे बाजाराभिमुख रूपांतर होणे आवश्यक आहे. बौद्धिक संपदा संरक्षणातूनच मूल्यनिर्मिती आणि उद्योगांची वाढ साध्य होऊ शकते, असेही त्यांनी अधोरेखित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *