62-year-old citizen caught in honeytrap | 62 वर्षीय नागरिक हनीट्रॅपमध्ये अडकले: खंडणी उकळणारी टोळी अटकेत; 2 कोटींऐवजी 60 लाखांत ठरला सौदा – Nagpur News



नागपूरमध्ये हनीट्रॅपद्वारे खंडणी उकळणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. गुन्हे शाखा आणि घरफोडी विरोधी पथकाने कारवाई करत सात पुरुष आणि चार महिलांसह एकूण ११ आरोपींना अटक केली आहे. एका ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला या टोळीने हनीट्रॅपमध्ये अडकवून त

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ६२ वर्षीय नागरिकाला या टोळीने लक्ष्य केले. आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाचे खासगी चित्रीकरण करून ते सार्वजनिक करण्याची धमकी दिली. सुरुवातीला त्यांच्याकडून ऑनलाइन आणि रोख स्वरूपात १ लाख ७८ हजार रुपये उकळण्यात आले.

त्यानंतर आरोपींनी थेट २ कोटी रुपयांची मागणी केली. अनेक वाटाघाटींनंतर अखेर ६० लाख रुपयांमध्ये हा सौदा निश्चित झाला होता.

सहायक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि घरफोडी विरोधी पथकाने १८ डिसेंबर रोजी एका हॉटेलमध्ये सापळा रचला. पोलिसांनी फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाला ६० लाखांऐवजी ३ लाख रुपये घेऊन आरोपींना भेटण्यासाठी पाठवले. हॉटेलमध्ये अश्विन धनविजय, नितीन कांबळे आणि कुणाल पुरी यांनी फिर्यादीकडून ३ लाख रुपये स्वीकारले आणि उर्वरित ६० लाख रुपयांची मागणी करताच पोलिसांनी त्यांना अटक केली.

या कारवाईत पोलिसांनी अश्विन विनोद धनविजय (वय ३९), नितीन सुखदेव कांबळे (वय ३८), कुणाल प्रकाश पुरी (वय ४२, सर्व अजनी), रितेश उर्फ पप्पू मनोहर दुरूगकर (वय ४१, नागपूर), आशिष मधुकर कावडे (वय ३६, गोंदिया), अविनाश हेमराज साखरे (वय ३५, गोंदिया), रविकांत कांबळे (नागपूर) यांच्यासह चार महिला आरोपींनाही अटक केली. आरोपींकडून एकूण १५०० रुपये रोख आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन असा एकूण १,५६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींविरुद्ध कलम ३०८, (२), ६१ (२), ३ (५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *