- Marathi News
- National
- Preparations For Cable Car To Amarnath Cave From 2029, Work Will Start From April 2027, Will Reach The Cave Via Baltal In Just 30 Minutes
बृजेंद्र सरवरिया | बालटाल21 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

येत्या दोन-तीन वर्षांत १३ हजार फूट उंचीवर असलेल्या पवित्र अमरनाथ गुफेपर्यंत भाविकांना केबल कार (रोप-वे) द्वारेही जाता येणार आहे. या प्रकल्पाची घोषणा गेल्या वर्षी जानेवारीत झाली होती. यानंतर नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेडने (एनएचएलएमएल) याचा डीपीआर तयार करून घेतला. त्याला जूनच्या मध्यावर केंद्र सरकारने परवानगी दिली होती. आता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये याच्या निविदा निघतील आणि पुढील वर्षी एप्रिलपासून यावर काम सुरू करण्याची तयारी आहे.
प्रकल्पाशी जोडलेल्या दोन सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर डीपीआरचा हवाला देत सांगितले की, २०२९ पर्यंत बालटालच्या डोमेल गेटवरून केबल कार चालवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. केबल कार गुहेच्या सुमारे दोन किमी आधी संगम टॉपपर्यंत जाईल. हे शेवटचे टर्मिनल स्टेशन असेल. येथून भाविकांना गुहेपर्यंत पायी किंवा पालखीतून जाता येईल. सध्या बालटाल ते गुहेपर्यंतचा पायी मार्ग १४ किमी आहे. केबल कार प्रकल्प ११.६ किमीचा असेल. यामुळे प्रवास ५ ते ८ तासांचा वेळ २५ ते ३० मिनिटांवर येईल. नुकतेच जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल आणि श्री अमरनाथ जी श्राइन बोर्डाचे अध्यक्ष मनोज सिन्हा यांनीही म्हटले आहे की, बाबा बर्फानींचे दर्शन प्रत्येक नागरिकासाठी सोपे बनवणे हा सरकारचा संकल्प आहे. या मार्गावर पायाभूत सुविधांचा विकास होईल. त्यामुळे बांधकामे वेगाने होत आहे. सूत्रानुसार केबल कार सध्याच्या पायी ट्रॅकच्या समांतर चालवण्याची योजना नाही. यासाठी टेकड्या, दऱ्यांच्या वरून एक एरियल स्ट्रेट लाइन (हवाई सरळ रस्ता) निवडण्यात आला आहे. मात्र तो पायी ट्रॅकजवळ असेल. टर्मिनलही ट्रॅकशी जोडल्याने भाविकांना सुरक्षित बाहेर काढता येईल. मुख्य गुहा आणि तेथील नैसर्गिक बर्फाच्या लिंगाची संवेदनशीलता वाचवण्याचाही प्रयत्न आहे.
प्रतितास २ हजार भाविक येऊ-जाऊ शकतील
१. हा प्रकल्प कोण तयार करत आहे? केंद्राच्या ‘पर्वतमाला प्रकल्पा’अंतर्गत बनवला जात आहे. बांधकामाची जबाबदारी रस्ते वाहतूक मंत्रालयाची नोडल एजन्सी एनएचएलएमएलकडे आहे.
२. प्रकल्पाचे अंदाजित बजेट काय आहे? डीपीआरनुसार, अंदाजित बजेट सुमारे १,२०० कोटी रुपये निश्चित केले आहे. जम्मू-काश्मिरात पहिल्या टप्प्यात बनणाऱ्या १६,००० कोटींच्या ८ मोठ्या रोपवे प्रकल्पांचा हा मुख्य भाग आहे.
३. अमरनाथ गुहेत १२ महिने जाता येईल? केबल कार ‘ऑल-वेदर’ तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल, जी जोरदार वारे आणि बर्फवृष्टी सहन करू शकते. पण, हिवाळ्यात अंतिम स्टेशन (संगम टॉप) च्या पुढे गुहेपर्यंतचा २-३ किमीचा पायी रस्ता जड बर्फामुळे बंद राहतो. त्यामुळे यात्रा उन्हाळ्यातच सुलभ होईल.
४. मग केबल कारचा काय फायदा आहे? याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी वेळेत जास्त भाविकांना दर्शन. सध्या श्राइन बोर्डाने बालटाल मार्गाने दररोज १० हजार नोंदणीकृत भाविकांची संख्या निश्चित केली आहे. डीपीआरनुसार प्रति तास १५०० ते २००० भाविकांची ने-आण करण्यासाठी केबल कार लावल्या जातील. म्हणजेच या दररोज २० हजार भाविकांना दर्शन घडवू शकतील.
५. प्रत्येक कारमध्ये किती लोक जातील? ब्लूप्रिंटनुसार सुमारे ३०-५० बंद केबिन असलेली केबल कार रोटेशनमध्ये चालवण्याचे लक्ष्य आहे. प्रत्येक केबिनची क्षमता ६ ते ८ प्रवाशांची असेल.
६. बालटाल मार्गाची आव्हाने कोणती? मोठे आव्हान ‘बरारीमार्क’ व ‘संगम टॉप’ मध्ये असेल. बरारीमार्क येथे बर्फाळ वाऱ्यांच्या दाबाने पिलर उभे करणे अत्यंत जोखमीचे आहे, तर संगम शिखर परिसर अतिशय बर्फ कोसळणारा भाग आहे.येथे पिलर्सना जड हिमनदीच्या दाबापासून सुरक्षित ठेवावे लागेल. केवळ ४ महिने (जून ते ऑक्टोबर) वर्किंग विंडो उपलब्ध असणे हे आव्हान आहे.
प्रथम पूजा संपन्न; यंदा सुमारे ५ फुटांचे हिमलिंग, शुक्रवार, ३ जुलैपासून यात्रा
गांदरबल/बालटाल | जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सोमवारी पवित्र गुहेत पोहोचून बाबा बर्फानी यांची प्रथम पूजा केली. वार्षिक तीर्थयात्रा शुक्रवार, ३ जुलैपासून सुरू होणार आहे. सध्या बाबा बर्फानी सुमारे ५ फूट उंचीचे दिसत आहेत. म्हणजेच यात्रा सुरू झाल्यावर भाविकांना सुमारे साडेचार फूट हिमलिंगाचे दर्शन होऊ शकते. गेल्या वर्षी यात्रेच्या पहिल्या दिवशी हिमलिंगाचा आकार सुमारे ४ फूट होता. गेल्या दोन वर्षांपासून काश्मीरमध्ये उष्णता वाढली आहे. यामुळे यात्रा सुरू होण्यापूर्वीच हिमलिंगाचा आकार लहान होतो. श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला पवित्र गुहेत प्रथम पूजा आयोजित करते.
