Gunratna Sadavarte Criticizes CM Shinde

महाराष्ट्र


“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भविष्यात पुन्हा कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. हातावर तंबाखू घेऊन चुना चोळला आणि तोंडात टाकला, इतके मुख्यमंत्रिपद सोपे नसते. उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वादाच्या एका राजकीय अपघातातून शिंदे एकदा मुख्यम

.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदावर्ते यांनी दसरा मेळाव्यातील नेत्यांची भाषा, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा कथित अवमान, टायगर श्रॉफ आणि सलमान खान प्रकरण तसेच छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारावर सविस्तर भाष्य केले.

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत – सदावर्ते

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यांवर आणि दसरा मेळाव्यातील वादावर सदावर्ते म्हणाले, “शिंदे यांच्या पक्षातील कार्यकर्ते आपल्या मुलाबाळांना मंत्रीपदे मिळावीत किंवा महामंडळे मिळावीत म्हणून ‘शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार’ अशा घोषणा देत त्यांना चण्याच्या झाडावर चढवत आहेत. मात्र, प्रदीर्घ अभ्यास आणि संघर्षाशिवाय कोणीही पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसू शकत नाही.”

500 कोटींचा वाद आणि हिशेब

“मनोज जरांगे पाटील आणि शिंदे यांच्यात अंतर्गत हिशेबाचे काही बिनसले असावे. स्वतःचा हिशेब थेट मागता येत नसल्याने आणि अटी-शर्ती तुटल्याने जरांगेंनी यात भाजपचे नाव काल्पनिकपणे घुसडले. ‘हिशेब दिला नाही तर नाकीनऊ आणीन’ असा दबाव तंत्राचा भाग म्हणून हा 500 कोटींचा कांगावा केला गेला. उद्योगमंत्री उदय सामंत यांना हिशेब चांगला समजतो, त्यामुळे ‘त्या कोटीचे नेटी आणि कोणाच्या पेटी’ हे सामंत यांनीच लवकरात लवकर जाहीर करावे.”

गोळीला गोळीने उत्तर देणारे एकनाथ शिंदे न्यायाधीश आहेत का?

शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री यांच्या वक्तव्यांवर आक्षेप घेत त्यांनी कायद्याचा दाखला दिला. “पुर्णेकर हत्या प्रकरणानंतर एकनाथ शिंदे यांनी ‘गोळीला गोळीने उत्तर देऊ’ असे वक्तव्य केल्याचे समोर आले. या देशात 3 स्तरीय न्यायव्यवस्था आहे. कसाबसारख्या दहशतवाद्यालाही कायद्यानुसार फाशी दिली गेली. शिंदे हे काही मिलिटरी कमांडर किंवा पोलीस शिपाई नाहीत; अशा प्रकारे गँगस्टरसारखी भाषा वापरून संविधानाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांनी कायद्याचा हक्कभंग करू नये, याची दखल राज्यपालांनी घेतली पाहिजे.”

सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागावी

“टायगर श्रॉफच्या घरी स्वतःहून जाऊन शिंदे सोफ्यावरून उभे राहतात; मात्र सामान्य शिवसैनिकाच्या घरी जात नाहीत. बिश्नोई समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक भावना दुखावल्या असतील, तर अभिनेता सलमान खानने त्या समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे. माफी मागितल्याने कोणाची उंची कमी होत नाही.”

बाबासाहेब आंबेडकरांच्या शेजारी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणे अक्षम्य!

दसरा मेळाव्यात वापरण्यात आलेल्या फलकांवर आणि छायाचित्रांवरून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “दीक्षाभूमीवर समानतेची आणि ज्ञानाची चर्चा होते, तो आदर्श राजकीय नेत्यांनी ठेवला पाहिजे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आणि अखंड भारताचे महापुरुष आहेत. ‘उठाव लुंगी, बजाव पुंगी’ अशा घोषणा देणाऱ्या आणि भेदभावाचे राजकारण करणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो बाबासाहेबांच्या बरोबरीने लावणे हा संविधानाचा आणि बहुजन समाजाचा अक्षम्य अवमान आहे. यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाने जाहीर माफी मागितली पाहिजे.”

छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील शिपाई भरतीत अंधेर कारभार

उच्च न्यायालयाच्या चतुर्थ श्रेणी भरती प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवत त्यांनी थेट मुख्य न्यायमूर्तींकडे दाद मागितली. “छत्रपती संभाजीनगर येथे उच्च न्यायालयाच्या सुमारे 500 ते 1,000 पेक्षा अधिक शिपाई (चतुर्थ श्रेणी) पदांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा पार पडली. यामध्ये एलएलबी (LLB) झालेले उच्चशिक्षित तरुणही बसले होते. मात्र, परीक्षेच्या वर्गात कोणताही अधिकृत निरीक्षक (Observer) किंवा परीक्षक उपस्थित नव्हता. सकाळी मनाला वाटेल तसे कमी गुण आणि दुपारच्या सत्रात भरभरून गुण वाटण्यात आले, असा विद्यार्थ्यांचा थेट आरोप आहे.”

न्यायालयीन आयोगामार्फत तपास करा

“जेव्हा विद्यार्थी तक्रार घेऊन गेले, तेव्हा त्यांची दखल घेतली गेली नाही. न्यायमंदिरातील नोकरभरतीतच जर अंधार असेल, तर न्यायालयाच्या पावित्र्यावर प्रश्न निर्माण होतील. म्हणूनच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी या प्रकरणी तात्काळ न्यायालयीन आयोग नेमून पारदर्शक चौकशी करावी आणि तोपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित ठेवावी,” अशी मागणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी शेवटी केली.

———————————–

हेही वाचा…

अमित शहाच लॉरेन्स बिश्नोईचे खरे सूत्रधार!: संजय राऊतांचा पुन्हा आरोप; म्हणाले- 500 कोटींवरून शिंदेंना EDने समन्स पाठवावे, हरदीप पुरींच्या फोटोंवरून ‘रेझिम चेंज’चा पुनरुच्चार

“देशभरातील गुन्हेगारी टोळ्या आणि माफियांचे जाळे भारतीय जनता पक्षाच्या छत्राखाली आणण्याचे काम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. गुजरातच्या साबरमती तुरुंगातून गँग चालवणारा लॉरेन्स बिश्नोई हा केवळ बाहुले असून, त्यामागील खरा चेहरा अमित शहा यांचाच आहे. देशात आता विरोधकांना संपवण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगचा वापर राजकीय हत्यांसाठी होऊ शकतो,” असा अत्यंत गंभीर व खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry