[ads1]
![]()
जादूटोणा करून मुलाचा जीव घेतल्याच्या संशयातून एका 70 वर्षीय वृद्ध सासऱ्याने स्वतःच्या सुनेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिवळी नदी, पाहुणे ले-आउट परिसरात घडली. लक्ष्मी रविशंकर पाली असे मृत महिलेचे नाव असून, नत्थूलाल पाली असे आरोपीचे नाव आहे. हत्येनंतर आरोपी सासऱ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, नत्थूलाल यांच्या मुलाचा 2019 मध्ये मृत्यू झाला होता. तेव्हापासून सुनेनेच जादूटोणा करून मुलाचा जीव घेतल्याचा संशय नत्थूलाल यांच्या मनात होता. या कारणावरून घरात सतत वाद होत असत. नत्थूलाल नेहमी लक्ष्मीला मारून टाकण्याची आणि स्वतः आत्महत्या करण्याची धमकी देत असे. आरोपीच्या पत्नीची मानसिक स्थितीही ठीक नसल्याचे समोर आले आहे. कपडे धुत असताना कुऱ्हाडीने हल्ला शनिवारी दुपारी 12.15 वाजताच्या सुमारास लक्ष्मी यांची मुलगी नोकरीवर आणि मुलगा घराबाहेर गेला होता. लक्ष्मी घराच्या मागील बाजूस कपडे धुत असताना आरोपीने संधी साधून त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. गंभीर दुखापत झाल्याने लक्ष्मी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर विहिरीत उडी सुनेची हत्या केल्यानंतर आरोपीने घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत उडी घेतली. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर यशोधरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने नत्थूलालला बाहेर काढले. फुफ्फुसात पाणी गेल्याने त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा केले असून सुनेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. यशोधरानगर पोलिसांनी नत्थूलालविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वृत्त वाचा महिला आमदाराबाबत वादग्रस्त वक्तव्य भोवले:आमदार गायकवाडांवर बुलडाण्यात गुन्हा दाखल, रोहित पवारांकडून पोलिसांच्या ‘सिलेक्टिव्ह’ कारवाईवर निशाणा
भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसाच्या रॅलीत वाजवलेल्या गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केले होते. हे विधान सोशल मीडियावर पसरल्यानंतर एका 42 वर्षीय महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. महिलांच्या लज्जेस धक्का पोहोचवल्याच्या आरोपावरून बुलडाणा शहर पोलिसांनी मध्यरात्री आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वाचा सविस्तर
[ads2]
















Leave a Reply