नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २३ जागांसाठी ८६ जणांचे अर्ज दाखल


 

४५० अर्जाची विक्री, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली असून यासाठी आतापर्यंत ९७ जणांने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून ४५० अर्जाची विक्री झाल्याची नोंद आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दि.३० रोज मंगळवारी शेवटचा दिवस आहे.

 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चार मतदार संघातून २३ संचालक निवडूण द्यायचे आहेत. यामध्ये अ) प्राथमिक कृषी पतपुरवठा व वि.का. सेवा सहकारी संस्था तसेच धान्य अधिकोष सहकारी संस्था, ब) नागरी सहकारी बँक, नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण बिगर पतसंस्था, पगारदार नोकरांच्या सह. पतसंस्था, प्रक्रिया व पणन सहकारी संस्था इत्यादी मतदार संघ क) वरील प्रमाणे अ, ब. मतदार संघात समावेश नसलेल्या इतर सर्व सहकारी संस्था व व्यक्ती सभासद मतदार संघ आणि राखीव मतदार संघातून अनूसुचित जाती, जमाती, महिला प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्त जाती, जमाती विशेष मागासप्रवर्ग या चार मतदार संघातून २३ संचालक निवडायचे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दि.३० रोज मंगळवारी शेवटचा दिवस आहे. सोमवार दि. २९ रोजी उमेदवारी अर्ज विक्री करण्यासाठी आणि दाखल करण्यासाठी मोठ्याप्रमाणात बँकेच्या परिसरात गर्दी दिसून येत होती. सोमवारी ८४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण ८६ जणांनी वरील चार मतदार संघातील विविध मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर ४५० च्यावर जणांनी उमेदवारी अर्जाची खरेदी केली असून सोमवारी यामध्ये आ. तुषार राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांच्या पत्नी प्रिती रावणगावकर, माजी जि.प.सदस्या प्रतिताताई चिखलीकर-देवरे, माजी सभापती आनंदराव ढाकणीकर, बी.आर. कदम, माजी संचालक शिवकुमार भोसीकर, गोविंदराव नागेलीकर, राजेश कुंटूरकर, श्रावण पाटील भिलवंडे, रामचंद्र मुसळे, माजी संचालक कैलास गोरठेकर, मारोतराव कवळे, विजय सोनवणे यांच्यासह अनेकांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. १ जुलै रोजी या अर्जाची छाननी होणार असून २ जुलै ते १६ जुलै या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी राहणार आहे. यानंतरच बँकेच्या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार, एकंदरीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत रंगत भरत असणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.


Post Views: 58






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *