बिलोली शहर व तालुक्यात ठीक ठिकाणी व्यसनमुक्ती कार्यक्रम संपन्न 

बिलोरी बिलोली शहर व तालुक्यातील बडुर , कुंडलवाडी येथे महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभाग व जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीबाई मागासवर्गीय महिला मंडळ, बहाद्दरपुरा, ता. कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व्यसनमुक्ती अभियानांतर्गत जिल्हा भरात जनजागृतीचे कार्यक्रम सुरू असुन त्याचाच एक भाग म्हणुन बिलोली शहरांत बस स्टँड परिसरात व्यसनाधीनता पासुन दुर रहाण्याचा संदेश शाहिरी कला पथकाच्या माध्यमातून देण्यात आला . युवकांनी व नागरिकांनी उद्याचा शक्त भारत घडविण्यासाठी व्यसनाधीनते पासून दूर राहून आरोग्य संपन्न निरोगी समाज निर्माण करावा असा संदेश देण्यात आला . नागरिकांनी सदरील कार्यक्रमास मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधींच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली त्यानंतर व्यसनमुक्ती या विषयावर प्रास्ताविक करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी शाहीर साहेबराव वाघमारे नरंगलकर, शाहीर रमेश गिरी, ढोलकीवादक सुशांत वाघमारे, गायिका सुवर्णा वाघमारे, वंदना खरात व मधुकर लांडगे यांनी शाहिरीच्या माध्यमातून गीत, पोवाडे सादर करून व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली. दारू, बिडी-सिगारेट, तंबाखू, नशेचे पदार्थ व गांजा यांसारख्या घातक पदार्थांमुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती देण्यात आली.

सदरील कार्यक्रमाच्या माध्यमातून

जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग आणि लक्ष्मीबाई मागासवर्गीय महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभर व्यसनमुक्ती व समाजजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *