State Warehouse Corporation Workers Dismissal Protest Demand | वखार महामंडळातील कामगारांना कामावरून काढले, वंचित आक्रमक: पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा – Amravati News

0
15338851-4bcd-4f30-8cce-9e874fb0a61c_1765641132601.jpg



वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना सागर भवते व तेथील मजूर.

राज्य वखार महामंडळातून अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना अचानक कामावरून काढल्याने वंचित बहुजन युवा आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याच्या मागणीसाठी आघाडीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

.

कामगारांच्या तक्रारीनुसार, मालाची उचल आणि भरणा करण्यासाठी प्रति पोते ९ रुपये मोबदला देण्याचा नियम आहे. मात्र, महामंडळाकडून केवळ ७ रुपये प्रति पोते मोबदला दिला जात होता. कामगारांनी ९ रुपये मोबदल्याची मागणी करताच, त्यांना कोणतेही ठोस कारण न देता कामावरून कमी करण्यात आले.

वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी या प्रकरणात पुढाकार घेतला आहे. सर्व कामगारांना प्रति पोते ९ रुपये मोबदला देऊन त्यांना तात्काळ पूर्ववत कामावर घ्यावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

निवेदन सादर करताना वंचित बहुजन युवा आघाडीचे तिवसा तालुका अध्यक्ष सचिन जोगे, ज्येष्ठ नेते गुणवंत ढोणे, तालुका महासचिव अनिल सोनोने, सचिन डमके, पवन डमके, अनिकेत लांडे, श्रीकृष्ण निंभोरकर, हेमंत उईके, निलेश काळसरपे, रोषण गावणार, गौरव नेवारे, रवी धुर्वे, अक्षय वानखडे, विकी मंडरी, राहुल कडुकर, रोषण अन्नपूर्णे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कामगार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed