सातबारा फेरफारासाठी १४ हजारांची लाच:खिल्लारचा महसूल अधिकारी जाळ्यात

0
whatsapp-image-2026-06-05-at-101008-pm_1780681883.jpeg




सेनगाव तालुक्यातील खिल्लार येथील तक्रारदाराची वडिलोपार्जीत जमीनीचा फेरफार करून सातबाराला लावण्यासाठी १४ हजाराची लाच घेतांना ग्राम महसूल अधिकाऱ्यास शुक्रवारी ता. ५ रात्री सात वाजता सेनगाव ते हिंगोली मार्गावर पुसेगाव पाटी येथे रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. याबाबत लाचलुचपतच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील खिल्लार येथील एका तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेली जमीन हक्कसोड वाटणीतून तक्रारदाराच्या नावे आली होती. सदर जमीनीचा फेरफार करून सातबाराला नांव लावण्यासाठी त्यांनी तलाठी सज्जा येथे अर्ज दाखल केला होता. मात्र ग्राम महसूल अधिकारी रामेश्‍वर रोडगे याने २२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावेळी रोडगे याने ८ हजार रुपयांची रक्कम घेतली. उर्वरीत रक्कम देण्याची ठरले होते. या प्रकरणी तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. यावरून पडताळणी करण्यात आली. यावेळी रोडगे याने सेनगाव येथे १४ हजार रुपयेआणून देण्याचे सांगितले. मात्र त्यानंतर त्याने सेनगाव ते हिंगोली मार्गावर पुसेगाव पाटी येथे थांबल्याचे सांगत तेथे येण्याचे सांगितले. त्यावरून लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू , सुलभा राऊत, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख शकील, विजय शुक्ला, जमादार भगवान मंडलीक, राजाराम फुफाटे, रवींद्र वरणे, गोविंद शिंदे, गजानन पवार, अमोल जाधव, शिवाजी वाघ, महिला पोलिस कर्मचारी योगीता अवचार यांच्या पथकाने रात्री सात वाजण्याच्या सुमारास पुसेगाव पाटी शिवारात सापळा रचला होता. यावेळी तक्रारदाराकडून १४ हजाराची लाच घेतांना ग्राम महसूल अधिकारी रामेश्‍वर रोडगे यास रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *