तनपुरेंकडे पुण्यात 4 कोटींचे दोन फ्लॅट्स:एकूण स्थावर मालमत्तेचे चालू बाजार मूल्य 10 कोटी 82 लाख 5 हजार
![]()
अहिल्यानगर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांची संपत्ती १ कोटीने वाढली असून उत्पन्न घटल्याचे उमेदवारी अर्जासोबत त्यांनी सादर केलेल्या सत्यप्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या मालकीच्या एकूण स्थावर मालमत्तेचे चालू बाजार मूल्य १० कोटी ८२ लाख ५ हजार रुपये इतके आहे. यामध्ये पुण्यातील विमाननगर (लोहगाव) सारख्या उच्चभ्रू भागात असलेल्या प्रत्येकी १७५० चौरस फुटांच्या दोन आलिशान फ्लॅट्सचा समावेश आहे. या दोन्ही फ्लॅट्सची एकत्रित खरेदी किंमत ४ कोटी १९ लाख रुपये आहे. जंगम मालमत्ता: शेअर्स आणि बँकेतील ठेवींचा मोठा भरणा प्राजक्त तनपुरे यांच्याकडे २ कोटी ३६ लाख १७ हजार ८६९ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर त्यांची पत्नी सोनाली तनपुरे यांच्या नावावर १ कोटी ७३ लाख ३५ हजार ३२५ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. २०२४ मध्ये १ कोटी ३१ लाख ९२ हजार होती. वार्षिक उत्पन्न आणि कर्जाचा डोंगर वार्षिक उत्पन्न : तनपुरे यांचे वार्षिक उत्पन्न ३५ लाख ६८ हजार १३० रुपये इतके आहे, तर त्यांच्या पत्नीचे उत्पन्न ४१,१३० रुपये नोंदवले गेले आहे. २०२४ मध्ये वार्षिक उत्पन्न ४६ लाख ८२३० इतके होते. तनपुरे यांच्यावर ४ कोटी ६२ लाख ३५ हजार ६०२ रुपयांचे कर्ज आहे. सोने-चांदी : तनपुरे दांपत्याकडे प्रत्येकी १०० ग्रॅम सोने असून, त्याची चालू बाजार किंमत प्रत्येकी १२ लाख रुपये दर्शवण्यात आली आहे. सोनाली यांच्याकडे आणखी १० लाख रुपयांची ज्वेलरी आहे. कंपन्यांमध्ये गुंतवणूक: ‘प्राजक्त टेक्स्टाईल प्रा. लि.’ मध्ये ४८.१८ लाख व ‘प्रसाद शुगर अँड ॲलाइड ॲग्रो प्रॉडक्ट्स’ मध्ये ४४.६३ लाख. बँक खात्यांमधील ठेवी: स्टेट बँक ऑफ इंडिया (राहुरी शाखा) खात्यात सर्वाधिक ८१ लाख २९ हजार ९९१ रुपये जमा आहेत. राजूरकर दांपत्य १५ कोटींचे धनी नांदेडचे भाजपचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकर यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार राजूरकर दांपत्याकडे एकूण १४ कोटी ७२ लाख रुपयांहून अधिकची मालमत्ता असून, पतीपेक्षा पत्नी अधिक श्रीमंत असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.
