हिमायतनगरात घरफोडी; दीड लाखाच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला;ब्राम्हणवाडा येथून महिलेचे सोन्याचे एड चोरले
हिमायतनगर(प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे मंगरुळ येथे अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरफोडी करत सुमारे १ लाख २५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ जून रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते दि. ३ जून रोजी पहाटे २.३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादी अविनाश अमृता घमेवाड (वय ३५, रा. मंगरुळ, ता. हिमायतनगर) यांच्या घराचे कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १५४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनिरीक्षक शेख करीत आहेत.
विमानतळ परिसरातून झोपेत असताना सोन्याचे येड चोरी
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे येड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३ जून रोजी पहाटे १ ते ५ वाजण्याच्या दरम्यान ब्राह्मणवाडा परिसरात फिर्यादी हरमिंदर कौर दर्शनसिंग पुजारी (वय ५०, रा. ब्राह्मणवाडा, नांदेड) हे घराबाहेर मोकळ्या जागेत झोपले होते. यावेळी गळ्यात बांधून पाठीशी ठेवलेले सोन्याचे येड अज्ञात चोरट्याने चोरून नेले. घटनेप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २५७/२०२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार कांबळे करीत आहेत.