[ads1]
![]()
शहरातील एशियन हॉस्पिटलच्या एनआयसीयूमध्ये शुक्रवारी (४ सप्टेंबर) पहाटे लागलेल्या आगीतून ९ बालकांना वाचवले होते. यापैकी घाटीत दाखल २ नवजात जुळ्या बाळांचा रविवारी (६ सप्टेंबर) मृत्यू झाला. कन्नड येथील मुजाहिद कुरेशी आणि जबेरिया कुरेशी यांच्या या जुळ्या बाळांत एक मुलगा आणि एका मुलगी होती. या बाळांचा जन्म २५ व्या आठवड्यांत (प्री-मॅच्युअर) झाल्याने त्यांचे वजन १ किलो ३० ग्रॅम इतके होते. त्यांच्या फुप्फुसांचा पूर्ण विकास झाला नव्हता, असे घाटीच्या प्रभारी बालरोग विभागप्रमुख डॉ. तृप्ती जोशी यांनी दिली. एकाला डिस्चार्ज, एकाला हलवले डॉ. तृप्ती जोशी यांनी सांगितले की, घाटीत ४ मुले भरती होती. यातील जुळ्यांचा मृत्यू झाला असून, उर्वरित दोनपैकी एकाला डिस्चार्ज दिला, तर दुसऱ्याला इतर रुग्णालयात हलवले आहे. फुफ्फुसांचा विकास झाला नव्हता जुळ्यांना घाटीत ‘एनआयसीयू’मध्ये व्हेंटिलेटरवर ठेवले होते. मात्र रविवारी पहाटे ३ वाजता एका बाळाचा तर सकाळी ७ वाजता दुसऱ्या बाळाचा मृत्यू झाला. ‘रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम’ आणि फुप्फुसांचा योग्य विकास न झाल्याने त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती आणि याच कारणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
[ads2]
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad