Buddha statue ordered from Thailand consecrated at Anat Pindak Vihara, 228 youths given their own space for the practitioner who made them officers
![]()
येथील स्थानिक सिद्धार्थ नगर भागातील ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या ‘अनाथ पिंडक बुद्ध विहारात’ थायलंड येथे विशेष स्वरूपात निर्मिती केलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना व बुद्ध स्तूप विहाराचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे थायलंडवरून खास मागवण्यात आलेली भगवान बुद्धांची भव्य मूर्ती होती. या मूर्तीची एका सुशोभित आणि भव्य रथात स्थापना करून शहरात मुख्य मार्गावरून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. ही रॅली सिद्धार्थ नगर येथील बुद्ध विहारात पोहोचल्यानंतर मूर्तीची रितसर प्रतिष्ठापना करण्यात आली. संपूर्ण सोहळा दानदाते मधुकरराव तायडे, यशोदाबाई तायडे, यवतमाळचे उपजिल्हाधिकारी राहुल तायडे आणि हर्षा राहुल तायडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. तायडे परिवाराने ही मूर्ती आणि सर्व भिक्खू संघाला संपूर्ण किटसह दान केली. हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करण्यासाठी अनाथ पिंड बुद्ध विहार समिती, आम्रपाली उपासक-उपासिका संघ, सिद्धार्थ नवयुग मंडळ, विशाखा उपासिका मंडळ (रामजी नगर), पंचशील नवयुग मंडळ, पंचशील व्यायाम शाळा लेझीम पथक, सुजाता उपासक संघ आणि नवयुग मंडळ (भीम नगर) तसेच लॉर्ड बुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ज्येष्ठ सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी व परिसरातील बौद्ध बांधवांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन तायडे यांनी केले, तर सूत्रसंचालन आदर्श शिक्षक साहेबराव मोरडे गुरुजी यांनी केले.
अभ्यासिकेसाठी जमिनीचे दान बोरगाव मंजू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरली आहे. येथे अभ्यास करून आतापर्यंत २२८ पेक्षा अधिक मुले विविध शासकीय व नामांकित पदांवर रुजू झाली आहेत.
या ज्ञानयज्ञाला मोठी मदत म्हणून यशोदाबाई मधुकरराव तायडे व लक्ष्मीबाई वामनराव वानखेडे यांनी स्वतःच्या मालकीचे दोन प्लॉट (जागा) या अभ्यासिकेच्या विस्तारासाठी दान केले. त्यांच्या या दातृत्वाबद्दल भिक्खू संघाच्या वतीने त्यांना साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला.
