Mateen Patel Denies Knowing Nida Khan; Claims No Imtiyaz Jalil Link
![]()
नाशिकमधील टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप असलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची आज पुन्हा एकदा विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी केली जाणार आहे. या महत्त्वाच्या चौकशीपूर्वी मतीन पटेल यांनी या प्रकरणावर आपल
.
निदा खानसोबतच्या भेटीबाबत माहिती देताना एबीपी माझाशी बोलताना मतीन पटेल म्हणाले, “मी निदा खानला वैयक्तिकरित्या ओळखत नव्हतो. तिच्या आई-वडिलांनी मदतीसाठी फोन केला होता, म्हणून मी तिला दोन-तीन दिवसांसाठी रूम दिली होती. एकदा तिचा दूध आणि खारीसाठी फोन आला होता, तेव्हा मी मुलामार्फत ते साहित्य पाठवले होते. मात्र, निदा खान कोण आहे आणि तिची पार्श्वभूमी काय आहे, याची मला कल्पना नव्हती.”
इम्तियाज जलील यांचे नाव चर्चेत का?
मागील चौकशीत मतीन पटेलने इम्तियाज जलील यांच्याशी संपर्क झाल्याचे कबूल केले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “इम्तियाज जलील हे माझे नेते आहेत. मला कोणतीही अडचण आली की मी त्यांना फोन करतो. या प्रकरणात त्यांना काहीही माहिती नव्हती आणि निदा खान ही त्यांची नातेवाईकही नाही. जो कोणी असे आरोप करत आहे, तो खोटे बोलत आहे. माझ्या फोनमध्ये सर्व रेकॉर्डिंग्स असून त्यातून सत्य समोर येईलच.”
प्रशासकीय कारवाईवर नाराजी
या प्रकरणानंतर प्रशासनाने मतीन पटेल यांच्या घरावर हातोडा चालवला आहे. यावर संताप व्यक्त करताना ते म्हणाले, “केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. तरीही माझे घर पाडून माझ्या आई-वडील आणि भावाला रस्त्यावर आणले आहे. मी ज्याला घर विकले, त्यालाही आरोपी करून त्याचे घर पाडण्यात आले. हे पूर्णपणे चुकीचे असून मी याविरोधात न्यायालयात कायदेशीर लढाई लढणार आहे.”
एसआयटीच्या तपासाची दिशा
एसआयटी सध्या मतीन पटेल यांचा मोबाईल डेटा आणि फोन कॉल्स रिकव्हर करण्याचे काम करत आहे. निदा खानला आश्रय देण्यामागे नेमका कोणाचा हात होता किंवा कोणाच्या सांगण्यावरून हे घडले, याचा तपास पोलीस करत आहेत. यापूर्वी दोनवेळा चौकशी झाली असून, आजच्या तिसऱ्या फेरीतील चौकशीतून नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा…
नाशिक टीसीएस प्रकरण:निदा खानला आश्रय दिल्याच्या प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा; संजय शिरसाट यांची मागणी
नाशिकमधील नामांकित आयटी कंपनी टीसीएसमध्ये (TCS) समोर आलेल्या धर्मांतरण प्रकरणाने आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षित आश्रय देण्यात आला होता, असा आरोप केला जात आहे. या संपूर्ण कटामागे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा थेट आरोप राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. सविस्तर वाचा…
