वादळी वारा अन् “मान्सूनपूर्व’ने चार दिवसांत दुसऱ्यांदा अहिल्यानगरला झोडपले:आतापर्यंत 5.7 मिमी पावसाची नोंद, पुढील 5 दिवस जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट
![]()
मागील चार दिवसांत दोन वेळा वादळी वारे आणि मान्सूनपूर्व पावसाने शहर, जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. बुधवारी सायंकाळी ७ वाजता सुरु झालेला पाऊस तासभर सुरुच होता. वाऱ्याचा प्रचंड वेग असल्याने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जिल्ह्यात गेल्या ४ दिवसांत ५.
.
एप्रिल व मे महिन्यातील पहिले ३ आठवडे तापमान वाढ कायम होती. मात्र २७ मे पासूनच वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली होती. २८ ते ३१ मे या कालावधीत जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. १ जूनपासून मात्र मान्सूनपुर्व पावसाचे ढग दाटून येत होते. मात्र तुरळकच पाऊस झाला होता. १ ते ३ जूनपर्यंत ५.७ मिमी पाऊस झाला. गेल्या वर्षी संपुर्ण मे महिना हा अवकाळीचा पावसाचा ठरला होता. मे ते सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाचा जोर कायम होता.
जिल्ह्यात मान्सूनपुर्व पावसावर खरीपाचे भवितव्य ठरत असते. गेल्या ४ दिवसांपासून तुरळक सुरु असलेल्या पावसाने बुधवारी दमदार हजेरी लावली. शहरासह केडगाव, नालेगाव, भिंगार, पाईपलाईनरोड, नागापूर या भागात बुधवारी रात्री वादळी पाऊस झाला.त्यामुळे बहुतेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यातच वीज देखील गुल झाली होती. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील ५ दिवस म्हणजेच ३ जून ते ७ जून या कालावधीत हवामानात मोठा बदल होणार आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. जिल्ह्यासाठी मान्सूनपूर्व पाऊस हा महत्वाचा असतो. यंदा मे महिन्यातील शेवटच्या दिवसांत वाढलेले तापमान हे या मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक ठरले. त्यामुळे मान्सूनपुर्व पाऊस होत आहे. यंदा १० ते १५ जून या कालावधीत जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचे आगमन होईल. या अगोदर मात्र होणारा मान्सूनपूर्व पाऊस वादळी-वारे, विजांचा कडकडाट होणार आहे.
मध्यम पावसाची शक्यता
वाढलेले तापमान ठरले मान्सूनपूर्वसाठी पोषक
