चार दिवसांत 500 अतिक्रमणे हटवली:मनमाडच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास, राजकीय विरोध झुगारून प्रशासनाची धडक कारवाई; शहरातील रस्ते झाले रुंद‎

0
app_17804899196a201ebf53222_1465470.jpg



शहरासह राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेने सलग चौथ्या दिवशीही वेग कायम ठेवत मोठी कारवाई केली. चार दिवसांत सुमारे ५०० अतिक्रमणे हटविण्यात आल्याने शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि महामार्ग परिसर मोकळे झाले असून वाहतूक व्यवस

.

बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कारवाईत रेल्वे पुलाजवळील परिसर, रेल्वे स्टेशन रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, तुफान चौक, श्रीराम चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. दुकानांसमोरील शेड, रस्त्यावर आलेले पत्रे, कठडे तसेच इतर अडथळे हटविण्यात आले. या मोहिमेसाठी दोन जेसीबी व दोन ट्रॅक्टरची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आल्याने कारवाईला अधिक गती मिळाली. रेल्वे स्टेशन रोडपासून पुढे शहरातील प्रमुख मार्गांवर एकाच वेळी मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षांपासून अतिक्रमणांनी व्यापलेले रस्ते मोकळे झाल्याचे चित्र दिसून आले. कारवाईदरम्यान काही ठिकाणी किरकोळ शाब्दिक वाद झाले, तर काहींनी विरोध करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, नगरपालिका, पोलिस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त पथकाने कोणताही दबाव न जुमानता मोहीम सुरू ठेवली. शहरातील विविध भागांत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मोहीम जसजशी पुढे सरकत गेली तसतसे पुढील भागातील अनेक नागरिक व व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. विरोधकांकडून पक्षपाताचे आरोप करण्यात आले असले तरी प्रशासनाने सर्व कारवाई नियमानुसार आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार होत असल्याचे स्पष्ट केले.

मलब्याचे ढीग; पुनर्वसनाची धडपड अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर शहरातील अनेक भागांत मलबा, पत्रे, लोखंडी साहित्य आणि बांधकामांचे अवशेष पडलेले दिसून आले. अतिक्रमण हटविल्यानंतर अनेक व्यावसायिक व कुटुंबांनी पुन्हा व्यवसाय उभा करण्यासाठी आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *