कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा:घृष्णेश्वर मंदिर कॉरिडॉरच्या कामाला प्रशासनाकडून ऑक्टोबरची डेडलाइन

0
orig_new-project-2026-06-12t065147616_1781227321.jpg




बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा ‘ओंकारेश्वर’च्या धर्तीवर भव्य कॉरिडॉर विकसित करण्यात येत आहे. राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २१० कोटी रुपयांचा सुधारित विकास आराखडा मंजूर केला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या नाशिक कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता या आराखड्यातील सर्व विकासकामे ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी दर आठवड्याला या विकासकामांचा आढावा घेत आहेत. सोमवारी झालेल्या विशेष बैठकीत त्यांनी कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या. पुढील वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार असून तेथे येणारे लाखो भाविक वेरूळ येथे घृष्णेश्वर दर्शनासाठी येण्याची दाट शक्यता आहे. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ऑक्टोबरची डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे. जुना रस्ता होणार ‘नो व्हेइकल झोन’ वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वळण रस्त्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. हा नवीन मार्ग पूर्ण होताच मंदिराकडे जाणारा जुना रस्ता ‘नो व्हेइकल झोन’ म्हणून घोषित केला जाणार आहे. मंदिरात सुधारणा करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाची मंजुरी प्राप्त झाली आहे. मात्र, मंदिराच्या आतील काम नाजूक असल्याने ते पूर्ण होण्यास थोडा अधिक वेळ लागू शकतो, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मंदिरात केल्या जाणाऱ्या सुविधा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed