दिव्य मराठी इन्व्हेस्टिगेशन:व्हेल माशाची उलटी कोकण, मराठवाडा, हैदराबादमार्गे यूएई, दुबई, चीन, युरोपात, महाराष्ट्रात 5 वर्षात 117 कोटी रुपयांची उलटी जप्त
![]()
स्पर्म व्हेल माशाची उलटी म्हणजे अंबरग्रीस तस्करीचे गुन्हे राज्यात कमालीचे वाढलेत. एक किलो उलटीला १ कोटीची किंमत मिळते. विशेष म्हणजे भारतात वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या अनुसूची १ नुसार स्पर्म व्हेल अतिसंरक्षित जीव असून त्याच्या खरेदी-विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे. तरीही नजर चुकवून तस्कर ही उलटी समुद्र नसलेल्या पुणे, सातारा, मराठवाड्यासारख्या अंतर्गत भागात आणून लपवताहेत. येथूनच अंबरग्रीस आखाती व युरोपीय देशात पोहोचवतात. मोठ्या अर्थकारणामुळे ‘बनावट अंबरग्रीस’ विकणारीही टोळी सक्रिय आहे. राज्यात ५ वर्षांत ११७ कोटींची उलटी जप्त केली आहे. तस्करांना ७ वर्षांपर्यंतची शिक्षा स्पर्म व्हेल प्रामुख्याने गुजरातजवळील अरबी समुद्र, ओरिसाजवळ बंगालच्या उपसागर आणि अंदमान आणि निकोबार बेटांजवळ आढळतात. कायद्यानुसार व्हेल माशाचे उत्पादने बाळगणे किंवा विक्रीस बंदी आहे. असे करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो. ७ वर्षांपर्यंत कारावास व दंडाची तरतूद आहे. तरी राज्यात अंबरग्रीसची तस्करी जोरात सुरू आहे. उलटी म्हणतात पण प्रत्यक्षात विष्ठा सर्वसामान्य भाषेत याला ‘व्हेलची उलटी’ म्हटले तरी, प्रत्यक्षात ती माशाच्या शरीरातून बाहेर पडलेली मेणासारखी विष्ठा आहे. स्पर्म व्हेल सागरी जीव स्क्विड व कटलफिश खातात. त्यांच्या कडक चोचींमुळे जठराला दुखापत होऊ नये म्हणून माशाच्या शरीरात नैसर्गिकरित्या मेणासारखा चिकट स्राव तयार होतो. तो चोचींना स्वतःभोवती गुंडाळतो, यालाच अंबरग्रीस म्हणतात. बनावट अंबरग्रीसचा सुळसुळाट पोलिसांनी जप्त केलेल्या बऱ्याच प्रकरणात बनावट अंबरग्रीस आढळले आहे. प्रयोगशाळेत तयार होणारे हे अंबरग्रीस पॅराफिन वॅक्स, स्टेरिक ऍसिड, डिंक, राळ, मोबिल ऑईल, म्हशीची चरबी आणि माशांचे अवशेष विरघळवून तयार करतात. अंबरग्रीससारखा वास येण्यासाठी अत्तरे मिसळतात.
महागड्या अत्तरांमध्ये सुगंध टिकवण्यासाठी महागड्या अत्तरांमध्ये सुगंध दीर्घकाळ टिकवण्यासाठी आणि चीनमध्ये सेक्स पॉवर वाढवण्याच्या औषधांतही वापरले जाते. प्रीमियम ग्रेडच्या (पांढरा/राखाडी रंग) उलटीला १ कोटीपर्यंत, तर लोअर ग्रेडला (काळा रंग) १५ ते २५ लाख रुपये किलोचा भाव मिळतो. 1 कोकण, गुजरात, केरळ, तामिळनाडूतील अंबरग्रीस मुंबई, बेंगळुरूला आणतात.
2 हवाई, सागरी मार्गाने यूएई, दुबई, चीन, युरोपात जाते.
3 येथून ते हैदराबादमार्गे परदेशात रवाना होते
4 कोस्टल पोलिस, वन विभागाची नजर चुकवून डील होईपर्यंत मुंबई, पुणेमार्गे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात लपवतात. …तर प्रजाती नष्ट होईल उलटी अधिकृत करणे हिताचे असले तरी कायद्याविरोधात आहे. अंबरग्रीस व्यापार अधिकृत केल्यास “व्हेल’ची शिकार वाढून प्रजाती नष्ट होईल. यामुळेच जागात उलटीच्या विक्रीवर बंदी आहे.’ -एम.एस. रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक धोरण निश्चित करणार सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे. हा वन विभागाचा विषय नसून मत्स्यव्यवसाय विकास विभागाचा आहे. धोरण झाले तर तस्करीला आळा बसेल. शासनाचा महसूलही वाढेल.’ -नितेश राणे, मत्स्य व बंदर विकास मंत्री अंबरग्रीस अधिकृत करा व्हेल माशाच्या उलटीला चांगली किंमत असल्याने याची तस्करी होते. यात दलालांचा फायदा होतो. शासनाने हा व्यवसाय अधिकृत केल्यास मच्छीमारांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळेल.’ -डॉ. विनय नातू, माजी आमदार, गुहागर
