सारोळ्यात तहसीलदारांच्या हस्तक्षेपाने शेतकऱ्यांना मिळाला हक्काचा रस्ता:प्रलंबित प्रश्न मार्गी, अतिक्रमण हटवून महसूल विभागाने खुला केला मार्ग‎

0
app_17804754726a1fe6506e198_1004896543.jpg



शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीकामांमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतापर्यंत पोहोचण्यासाठीचा रस्ता. मात्र, सिल्लोड तालुक्यातील सारोळा शिवारातील शेतकरी गेल्या तब्बल १० वर्षांपासून यापासून वंचित होते. अनेक वर्षांचा पाठपुरावा, अर्ज आणि विनंत्या करूनही न

.

सारोळा शिवारातील गट क्रमांक ४८४, ४८५ आणि ४९० मधील शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा रस्ता काही वर्षांपासून अडथळ्यांमुळे पूर्णपणे बंद झाला होता. रस्ता बंद असल्याने शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी, पिकांची वाहतूक करण्यासाठी तसेच कृषी अवजारे ने-आण करण्यासाठी मोठा फेरा मारावा लागत होता. विशेषतः पेरणी, कापणी आणि शेतीमाल विक्रीच्या ऐन हंगामात ही समस्या अधिक तीव्र होत असे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च प्रचंड वाढत होता.

या गंभीर प्रश्नाबाबत त्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे वारंवार निवेदने सादर केली होती. शेतकऱ्यांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेत तहसीलदारांनी महसूल विभागाला प्रत्यक्ष स्थळ पाहणीचे आदेश दिले.

त्यानुसार महसूल विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन जागेची मोजणी केली. या पाहणीदरम्यान रस्त्याच्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आले. यानंतर प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता, कायद्याचा बडगा उभारत रस्त्यावरील सर्व अतिक्रमण आणि अडथळे जमीनदोस्त केले.

ग्रामीण भागातील अनेक वादग्रस्त आणि प्रलंबित प्रश्न वर्षानुवर्षे निकाली निघत नसल्याची ओरड नेहमीच होत असते. अशा परिस्थितीत सारोळा येथील रस्त्याचा क्लिष्ट प्रश्न महसूल प्रशासनाने प्रत्यक्ष मैदानात उतरून सोडवल्याने शेतकऱ्यांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

शेतकऱ्यांना आनंदाश्रू, प्रशासनाचे मानले आभार गेल्या १० वर्षांपासून आम्ही आमच्याच शेतात जाण्यासाठी परके झालो होतो. पण प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आज आमचा रस्ता मोकळा झाला. आता शेतीची कामे सुलभ होतील आणि वाहतुकीचा खर्चही वाचेल, अशा भावना सारोळा येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि महसूल विभागाच्या या धडक कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांचे जाहीर आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *