मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद पेटला:जैन धर्मगुरूंसाठी रंगवलेल्या रस्त्यांवरून मनसेचा इशारा, सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही- संदीप देशपांडे
![]()
मुंबईतील घाटकोपर-विद्याविहार परिसरात जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी रस्त्यांवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या रंगवण्यात आल्याच्या प्रकारावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आक्रमक भूमिका घेत या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. घाटकोपर परिसरातील काही रस्त्यांवर आणि सोसायटी परिसरात जैन धर्मगुरू व साध्वी अनवाणी चालताना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या रंगवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या कृतीवरून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून सार्वजनिक जागांवर अशा प्रकारे धार्मिक कारणांसाठी बदल करणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही – देशपांडे या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कठोर शब्दांत इशारा दिला. “पांढऱ्या पट्ट्या मारून सांस्कृतिक दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची यापुढे तोंड काळी करण्यात येतील,” असे वक्तव्य त्यांनी केले. मनसेच्या या भूमिकेमुळे हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण?
या प्रकरणावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्यानंतर अखेर संबंधित पांढऱ्या पट्ट्यांवर पुन्हा रंगकाम करण्यात आले आहे. युट्यूबर प्रसाद वेदपाठक यांनी हा मुद्दा सर्वप्रथम उचलून धरत सोसायटीतील सदस्यांची परवानगी न घेता जैन धर्मगुरूंसाठी पांढरी पट्टी रंगवण्यात आल्याचा आरोप केला होता. सार्वजनिक ठिकाणी धार्मिक प्रथा लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करत त्यांनी या पट्ट्या हटवण्याची मागणी केली होती. अखेर या वादाची दखल घेत संबंधित पट्ट्यांवर रंगकाम करण्यात आल्याची माहिती प्रसाद वेदपाठक यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली. तसेच या मुद्द्याला प्रसिद्धी देऊन दखल घेतल्याबद्दल त्यांनी माध्यमांचे आणि नागरिकांचे आभारही मानले. मान्सून मुंबईच्या दिशेने, राज्यात यलो अलर्ट:मान्सूनचा वेग जास्त, पण देशात अद्यापही सरासरीपेक्षा 22% कमी पाऊस केरळमध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या 6 दिवसांत नैऋत्य मोसमी पाऊस ईशान्येतील सर्व राज्ये, सिक्कीम आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालपर्यंत पोहोचला असून मुंबईच्या दिशेने आगेकूच करत आहे. मात्र, मान्सूनचा वेग जास्त असूनही देशात झालेला पाऊस सरासरीपेक्षा 22% कमी आहे. 1 ते 8 जूनपर्यंत 21.3 मिमी पाऊस झाला, तर सरासरी आकडा 27.2 मिमी आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून 16 राज्यांपर्यंत पोहोचला आहे. पुढील 24 तासांत तो मुंबईत, त्यानंतर 3 ते 5 दिवसांत महाराष्ट्राचा उर्वरित भागासह आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडपर्यंत पोहोचू शकतो. सविस्तर वाचा
