नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांविरोधात धडक मोहीम; दुसऱ्याच दिवशी 13.84 लाखांचा गुटखा जप्त

0
WhatsApp-Image-2026-06-03-at-18.37.28.jpeg


नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, मोहिमेच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी 13 लाख 84 हजार 721 रुपयांचा गुटखा व इतर साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले असून सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप यांनी 1 ते 30 जून 2026 या कालावधीत नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. मोहिमेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात एक, हिंगोली जिल्ह्यात एक आणि लातूर जिल्ह्यात दोन अशा एकूण चार कारवाया करण्यात आल्या.

या कारवाईत गुटखा विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हे नोंदवून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच भारतीय न्याय संहिता कलम 123 अंतर्गतही कारवाई करण्यात येत असून, दोषींना दहा वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे.

दरम्यान, गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी नांदेड परिक्षेत्रात पानटपऱ्यांची व्यापक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. एका दिवसात 264 पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली असून, गुटखा व अमली पदार्थांच्या संभाव्य साठवणुकीच्या ठिकाणांचीही तपासणी सुरू आहे.

अवैध व्यवसायांबाबत माहिती देण्यासाठी पोलिसांनी ‘खबर’ हेल्पलाईन सुरू केली असून 91 50 100 100 या क्रमांकावर नागरिकांना फोन किंवा व्हॉट्सॲपद्वारे माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पोलिसांनी नागरिकांच्या सहकार्याने ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *