सोलापूर विधान परिषदेत हायव्होल्टेज ड्रामा!:कॉंग्रेस उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप; प्रणिती शिंदे म्हणाल्या- आदित्य फत्तेपूरकरवर दबाव आणला गेला
![]()
सोलापूर विधानपरिषदेत कॉंग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आल्याने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर तसेच आमदारांसमोर जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली आहे. बहुमत असून सुद्धा हे सरकार आम्हाला घाबरत असल्याची टीका कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर सकडून टीका केली आहे. त्या म्हणाल्या, आज या ठिकाणी स्क्रूटीनी होती, विधान परिषदेची निवडणूक आहे. काल आमचा उमेदवार आदित्य फत्तेपूरकर महाविकास आघाडीकडून फॉर्म दिला. 10 अधिकृत सह्या करण्यात आल्या होत्या. स्क्रूटीनीच्या वेळेस एक सही ज्याने केली होती त्यांना भाजपच्या आमदाराने वरून काही सूचना आल्या असतील, भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर परचंद दबाव आणला. पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, आदित्य फत्तेपूरकर यांच्यावर प्रचंड दबाव आणि त्याला पळवून नेले, किडनॅप केले. त्याला खोटा अॅफीडेव्हिट सादर करण्यासाठी दबाव आणला, की ही माझी सही नाही आहे. त्या माणसाचे आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे, त्याने स्वतः आमच्या उमेदवाराला फोन केला आणि त्याला सांगितले की माझी सही घेऊन जा, माझ्यावर दबाव आहे, असे त्याने फोनवरून सांगितले. प्रणिती शिंदे म्हणाल्या, जर त्यांच्याकडे बहुमत आहे तर भीती कसली आहे? काय सिद्ध करायचे आहे गुंडगर्दी करून? किती गलीच्छ राजकारण आहे. लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे. मी कलेक्टरला सांगितले की, तुम्ही कोणत्या पक्षासाठी काम नाही करते, तुम्ही देशासाठी सेवा करत आहात, हे भान ठेऊन निकाल द्या. आता प्रेशर आणून निर्णय बदलले जात आहेत. आधी कधी असे नव्हते. तुमचा निर्णय पारदर्शक पद्धतीने द्या आणि निवडणूक होऊ द्या, असे शिंदे यांनी म्हटले आहे. पराभव दिसत असल्याने कॉंग्रेसची तलवार म्यान दरम्यान, भाजप नेत्यांनी या प्रकरणी बोलताना सांगितले की, लोकशाहीत आपण आपली भूमिका लोकशाही पद्धतीने मांडली पाहिजे. जो पक्ष सांगतोय की आमचा संविधानावर विश्वास आहे, त्यांनी संविधानावर विश्वास ठेऊन, संविधानाचा आधार घेऊन आपली भूमिका मांडली पाहिजे. पराभव समोर दिसतोय, आपले मतदार सोबत नाहीयेत, आपली काही डाळ शिजणार नाही हे लक्षात घेऊनच त्यांनी तलवार म्यान करून खाली ठेऊन निवडणुकीतून पळ काढण्याचा हा प्रकार आहे.
