Petrol Diesel Rate | पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; कुठे वाढ, कुठे दिलासा? तुमच्या शहरातील आजचे नवीन रेट तपासा

0
sayali-web-2026-05-20T165137.369.webp.webp


Petrol Diesel Rate | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळाले. काही शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर राहिले, तर काही ठिकाणी किरकोळ वाढ आणि घट नोंदवण्यात आली आहे. जयपूर आणि भुवनेश्वरमध्ये पेट्रोल-डिझेल महागले असून, बंगळुरू आणि लखनौमध्ये वाहनधारकांना थोडा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर १०२.१२ रुपये आणि डिझेल ९५.२० रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. नोएडामध्येही कोणताही बदल झाला नसून पेट्रोल १०२.१२ रुपये आणि डिझेल ९५.५६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. गुरुग्राममध्ये मात्र पेट्रोल ८ पैशांनी स्वस्त होऊन १०२.६९ रुपये आणि डिझेल ९५.३६ रुपये प्रति लिटर झाले आहे.

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आज सर्वाधिक दरवाढ दिसून आली. येथे पेट्रोल ६९ पैशांनी वाढून ११३.३५ रुपये प्रति लिटर झाले असून डिझेलचा दर ६१ पैशांनी वाढून ९८.३९ रुपये झाला आहे. भुवनेश्वरमध्येही पेट्रोल २४ पैशांनी वाढून १०९.०५ रुपये आणि डिझेल १००.७६ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

मुंबईत पेट्रोलचा दर १११.२१ रुपये प्रति लिटर असून त्यात ३ पैशांची वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १०७.८८ रुपये प्रति लिटर दराने विकले जात असून येथेही किरकोळ ४ पैशांची वाढ झाली आहे.

दुसरीकडे, बंगळुरूमध्ये पेट्रोलच्या दरात २८ पैशांची घट झाली असून नवीन दर ११०.६० रुपये प्रति लिटर झाला आहे. डिझेलही स्वस्त होऊन ९८.५४ रुपये प्रति लिटरवर आले आहे. लखनौमध्ये पेट्रोल १९ पैशांनी कमी होऊन १०१.८६ रुपये आणि डिझेल ९५.३६ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. बिहारची राजधानी पाटणामध्येही पेट्रोलचा दर १८ पैशांनी घसरून ११३.५४ रुपये झाला आहे.

News Title: Petrol Diesel Rate Today Fuel Price June 8

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *