Suryakumar Yadav | सूर्यकुमार यादवला आणखी एक मोठा धक्का? क्रिकेट विश्वात तर्कवितर्क
Suryakumar Yadav | भारतीय क्रिकेट संघातील अलीकडील घडामोडींमुळे स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पुन्हा चर्चेत आला आहे. टी-20 संघातील स्थान गमावल्यानंतर आणि कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेतल्यानंतर आता त्याच्या आयपीएल (IPL) भवितव्याबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेषतः मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाशी त्याचे संबंध संपुष्टात येणार का, याबाबत क्रिकेट वर्तुळात विविध तर्कवितर्क मांडले जात आहेत.
आयर्लंड (Ireland) आणि इंग्लंड (England) विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात सूर्यकुमार यादवला स्थान मिळाले नाही. त्याचबरोबर त्याच्याकडून टी-20 कर्णधारपदाची धुराही काढून घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर आता त्याच्या आयपीएल कारकिर्दीबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, सूर्यकुमारने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) खात्यावरून मुंबई इंडियन्सला अनफॉलो केल्याची बाब समोर आली आहे. एवढेच नव्हे तर त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर मुंबईच्या जर्सीतील एकही छायाचित्र दिसत नसल्याचेही चाहत्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे तो संघापासून दूर जाणार असल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. मात्र, त्याची पत्नी देविशा शेट्टी (Devisha Shetty) अजूनही मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर फॉलो करत असल्याचे दिसून येते.
Suryakumar Yadav | पुढचा संघ कोणता असणार? :
इंडियन प्रीमिअर लीग 2026 साठी मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवला 16.25 कोटी रुपयांच्या रकमेत कायम ठेवले होते. 2018 पासून तो मुंबईच्या संघाचा महत्त्वाचा सदस्य राहिला आहे. मात्र आता असे म्हटले जात आहे की, जर त्याने मुंबई इंडियन्सची साथ सोडली तर त्याचा जुना संघ कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) त्याच्यासाठी पर्याय ठरू शकतो. संघाला अनुभवी कर्णधार आणि भारतीय अव्वल फळीतील फलंदाजाची गरज असल्याने सूर्यकुमार त्यांच्यासाठी योग्य पर्याय मानला जात आहे.
कोलकाता नाईट रायडर्सव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ देखील त्याला आपल्या ताफ्यात सामील करण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी चर्चा आहे.
