Supriya Sule Alleges Misuse of Central Agencies to Break NCP-Shiv Sena

0
copy-of-ai-watermark-marathi_1780899690.jpg


राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फुटले नसून त्यांना जाणीवपूर्वक फोडण्यात आले, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाचा राजक

.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधी पक्षांवर दबाव आणण्यासाठी केला जात आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत जे घडले, त्याच पद्धतीने आता पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसलाही लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाहीत विरोधी पक्षांना कमकुवत करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्या म्हणाल्या.

उद्धव ठाकरे बैठकीत ऑनलाइन सामील होणार – सुळे

दरम्यान, इंडिया आघाडीच्या आज होत असलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीबाबत माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ऑनलाइन माध्यमातून बैठकीत सहभागी होणार असल्याचे सांगितले. विरोधी पक्षांमध्ये समन्वय वाढवणे, आगामी निवडणुकांसाठी रणनीती निश्चित करणे आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करणे हा या बैठकीचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र असून विरोधकांची एकजूट अधिक मजबूत करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या “कॉकरोच जनता पार्टी”चे स्वागत केले.

कर्जमाफी चुकीची नाही, पण निकष अडचणीचे- शरद पवार

राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत अनेक शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. कर्जमाफीसाठी घालण्यात आलेल्या अटी आणि पात्रतेच्या निकषांमुळे मोठ्या संख्येने शेतकरी योजनेबाहेर राहतील, अशी टीका होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सरकारचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे असे म्हणणे योग्य नाही. मात्र त्यामध्ये काही व्यावहारिक अडचणी आहेत. त्यामुळे हा निर्णय थेट फेटाळण्याऐवजी त्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.

इतरांची मुलं मंत्री, तोच न्याय मला लावा:राज्यसभा उमेदवारीवर छगन भुजबळ म्हणाले- मी नाराज नाही, भाजपने विरोध केला यात तथ्य नाही!

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा उमेदवारीचा विषय चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेत पाठवले जाईल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, शेवटच्या क्षणी चित्र बदलले आणि उमेदवारी राजेंद्र जैन यांच्या गळ्यात पडली. या घडामोडीमागे केवळ उमेदवारीचा प्रश्न नसून, भुजबळांनी घातलेली एक राजकीय अट आणि महायुतीतील सत्तासमीकरणे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी डावलल्याने नाराज असल्याच्या चर्चांवर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले. सविस्तर वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed