पडताळणीनंतरच शेतीसाठी मिळेल डिझेल:वारंवार घेतल्यास कारवाई, राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाचे परिपत्रक
![]()
पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठाउपलब्ध असतानाही काही भागातइंधनाची अनधिकृत खरेदी, साठेबाजी,गैरवापराच्या घटना वाढल्याचेनिदर्शनास आल्याने शासनाने कठोरपावले उचलली आहेत. वारंवार बॅरल,पिंपामध्ये इंधन घेतल्यास कारवाईहोणार आहे. शेतीसाठी प्रत्यक्षगरजेनुसार, योग्य पडताळणीच्याअधीन राहूनच डिझेलचा पुरवठाहोणार आहे. अन्न, नागरी पुरवठा वग्राहक संरक्षण विभागाने जारी केलेल्यापरिपत्रकाद्वारे जिल्हा प्रशासन, पुरवठा विभाग, पोलिस यंत्रणांना विशेषतपासणी मोहीम राबवण्याचे आदेशदिले आहेत. इंधन दरवाढीचे मुख्य कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार असल्याचे सांगितले जातआहे. इराण आणि अमेरिकेतील युद्ध सुरू होण्यापूर्वी क्रूड ऑइलचे दर ७० डॉलरहोते. ते आता वाढून १०० डॉलर प्रतीबॅरलच्या पुढे गेले आहेत. क्रूडच्या किमती वाढल्याने तेल कंपन्या दबावाखाली होत्या.त्यामुळे कंपन्यांनी तोट्याची भरपाईकरण्यासाठी इंधन दरवाढीचे पाऊलउचलले आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.दरम्यान खरीप हंगाम तोंडावर असतानाचशेतकऱ्यांसमोर डिझेलचा प्रश्न निर्माणझाला आहे. शेतातील मशागत, नांगरणी,पेरणीपूर्व कामे, ट्रॅक्टर चालवण्यासाठीशेतकऱ्यांना डिझेलची गरज भासत आहे.आता नवीन आदेशानुसार कृषीकामासाठी डिझेल हे पडताळणीच्याअधीन राहून मिळणार आहे. असामान्य विक्री दिसल्यास अचानक तपासणी करणार शहरात २० तर ग्रामीण भागात १२५पेट्रोल पंप आहेत. जिल्ह्यात सुमारे १००ते १२५ टँकर्स येतात. मात्र जिल्ह्यातकाही दिवसांपूर्वी पेट्रोलची विक्री ४४टक्के तर डिझेलची विक्री १५४ टक्केजादा वाढली होती. त्यामुळे आतापेट्रोल पंपांच्या दैनंदिन विक्रीचीमाहिती तपासली जाणार आहे.एखाद्या पंपावरील विक्रीमध्येअचानक, असामान्य वाढ दिसल्यासतातडीने तपासणीचे आदेश देण्यातआले आहेत. तसेच जिल्हाप्रशासनाला तेल कंपन्यांशी समन्वयठेवून पुरवठा साखळीतील विसंगतीशोधण्याच्या सूचना देण्यात आल्याआहेत. कंपनीकडून खरेदी करणे अपेक्षित मोठ्या औद्योगिक किंवा व्यावसायिकग्राहकांनी थेट तेल कंपन्यांकडून इंधनखरेदी करणे अपेक्षित आहे. मात्रकिरकोळ पेट्रोल पंपावरून मोठ्याप्रमाणात इंधन खरेदी केल्यास(घाऊक व्यावसायिकांनी)संबंधितांवर कारवाई होणार आहे. वैधपावत्या, डिलिव्हरी चलन किंवास्फोटक सुरक्षा प्रमाणपत्राशिवायइंधन वाहतूक करणाऱ्या टँकर,बाउझर, वाहनांची तपासणी करूनकारवाई करण्यात येणार आहे. परिपत्रकानुसार संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत पेट्रोलियम पदार्थांच्या खरेदी-विक्रीतील गैरव्यवहारांना प्रतिबंध घालण्यासाठी राज्यशासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सूचनांचे परिपत्रक प्राप्त झाले आहे. हेपरिपत्रक संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. पेट्रोलपंपावर बल्कमध्ये इंधनमिळणार नाही. परिपत्रक ०७ नुसार कार्यवाही होईल. – रवींद्र ऐन्नावार, जिल्हा पुरवठा अधिकारी. कोणत्या अनियमिततेवरहोणार कारवाई? पेट्रोल किंवा डिझेलचा कृत्रिम तुटवडानिर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणातसाठा करून काळ्या बाजारात विक्रीकरणाऱ्यांवर अत्यावश्यक वस्तूअधिनियमासह संबंधित कायद्यांनुसारकारवाई केली जाणार आहे. किरकोळग्राहक, अर्थात वाहनधारकांसाठीउपलब्ध असलेले इंधन इतरव्यावसायिक किंवा औद्योगिकवापरासाठी वळवल्यास संबंधितांवरजीवनावश्यक वस्तू अधिनियमातीलकलमानुसार कारवाई होणार आहे. किरकोळ विक्री केंद्रांमधून टँकर, बाउझरकिंवा मोठ्या कंटेनरमध्ये अनधिकृतपणेइंधन भरण्याच्या घटनांवर विशेष लक्षठेवून तपासणी केली जाणार आहे.वारंवार बॅरल, पिंप किंवा इतर कंटेनरमध्येइंधन भरणाऱ्या संशयित वाहनांचीचौकशी करून आवश्यक ती कारवाईकरण्यात येणार आहे. सुरक्षा नियमांचेउल्लंघन करून इंधनाची वाहतूक,हाताळणी किंवा मंजूर क्षमतेपेक्षा अधिकसाठवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणारआहे.
