नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची धडक कारवाई:एकाच आठवड्यात 67 लाखांचा गुटखा व अमली पदार्थ जप्त!

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-06-08t182756450_1780923599.jpg




नांदेड परिक्षेत्रात चार जिल्ह्यातून गुटखा व अमली पदार्थ विक्री विरोधात 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच आठवड्यात (1 ते 7 जून) पोलिसांनी मोठी कारवाई करत 67,02,671 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण 48 आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील एकूण 2702 पानटपऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. भारतीय न्याय संहितेच्या कलम 123 अंतर्गत गुटखा विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध एकूण 30 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हानुसार झालेली कारवाई नांदेड: 530 पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली असून, 12 आरोपींवर 11 गुन्हे दाखल केले आहेत. तर 25,21,741 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लातूर: 609 पानटपऱ्यांची तपासणी, 7 गुन्हे, 18 आरोपी आणि 27,47,353 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परभणी: 839 पानटपऱ्यांची तपासणी, 9 गुन्हे, 14 आरोपी आणि 12,64,043 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हिंगोली: 724 पानटपऱ्यांची तपासणी, 3 गुन्हे, 4 आरोपी आणि 1,69,531 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांपर्यंत तात्काळ पोहोचावी यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 9150100100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ हेल्पलाईन सुरू केली आहे. या क्रमांकावर नागरिक फोन करून किंवा व्हॉट्सॲप मेसेजद्वारे आपल्या भागातील अवैध व्यवसायांची अचूक माहिती देऊ शकतात. नागरिकांनी गुटखा, अमली पदार्थ आणि इतर अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed