पारधी बेड्यावरील दिव्या काळेचे 12 वीत 91% गुण:खासदार अमर काळे यांनी घरी जाऊन केला सत्कार

0
995ef953-35e7-4292-b927-6c9755b5d21b_1780155006960.jpg




मोर्शी तालुक्यातील जामणी येथील पारधी बेड्यावर राहणाऱ्या दिव्या रवींद्र काळे हिने १२ वी सीबीएसई परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. तिच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी थेट तिच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला. पारधी समाजाला अजूनही शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर मानले जाते. अशा परिस्थितीत कोणत्याही विशेष सोयी-सुविधा नसताना दिव्याने केंद्रीय बोर्डाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. तिचे हे यश समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. दिव्याच्या यशात तिच्या पालकांचा मोठा वाटा आहे. तिची आई स्वतः नववीपर्यंत शिकलेली असून, वडील शेती करतात. त्यांनी दिव्याला शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले. खासदार अमर काळे यांनी दिव्याच्या यशाचे कौतुक करताना म्हटले की, “शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजातील एका मुलीने सीबीएसईसारख्या कठीण परीक्षेत ९१ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणे ही अत्यंत अभिमानास्पद आणि आश्चर्यकारक बाब आहे.” याच दौऱ्यादरम्यान खासदार काळे यांनी जामणी येथील श्रेया दुधाने (१० वीत ९४.२०%) आणि अनुष्का बुधबावरे (१२ वीत ९०%) या दोन गुणवंत विद्यार्थिनींचाही सत्कार केला. या सत्कार सोहळ्याप्रसंगी खासदार अमर काळे यांच्यासोबत अभ्युदय मेघे, संजय काकडे, विजय घवघवे, प्रमोद काकडे, बाळू वरकड, अविनाश अंबुलकर, कैलास बुधबावरे, राजू झाडे, विशाल गोमासे, साहेबराव चोपडे, विष्णू ठाकरे, रमेश काकडे, सुनील काकडे, सचिन गोमासे, अरुण इंगोले, बाबा जाधव आणि बंडू पाळेकर यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed