पीओकेमध्ये तिरंगा का नाही?, संघाने मोदींना सवाल करावा:राज्याला वाऱ्यावर सोडून महाराष्ट्र सरकारचे व्यवहारावर लक्ष- संजय राऊत

0
730-x-548-2025-06-24t10203267317507405921753851943_1780118749.jpg




सरकारकडून राज्याला वाऱ्यावर सोडून व्यवहारावर लक्ष केंद्रित केले जात आहे. पण आम्ही त्यावर काही बोलणार नाही, कारण त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होईल. संघ आता मजबूत आहे त्यांनी मोदींना विचारायला हवे पाकव्याप्त काश्मीरमध्ये झेंडा का फडकवला नाही, असा सवाल संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला पाहिजे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, विधान परिषदेच्या दोन जागांवर आमची चर्चा सुरू आहे. निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहे. स्वबळावर कोणीही निवडणूक जिंकू शकत नाही. आता पुणे दिवसांसुद्धा बंद ठेवावे लागेल संजय राऊत म्हणाले की, पुणे, पिंपरी चिंचवड या भागामध्ये विषारु दारू पिल्याने 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही काळापासून पुण्यामध्ये अवैध धंदे, गुन्हेगारीचा उद्रेक सुरू आहे. पुणे पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारी वाढू नये म्हणून रात्री 10 नंतर पुणे बंदचे आदेश काढले आहेत. कालच दारू कांड पाहिल्यावर मला असे वाटते की पोलिस आयुक्तांना आता दिवसासुद्धा पुणे बंद करावे लागेल. आमदारांचे दारू, मटक्याचे धंदे संजय राऊत म्हणाले की, पुण्यात विषारी दारू मिळते आणि लोकं ती पित आहेत म्हणजे हे नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रात आहे. मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने गेली 7 वर्षे हे नेटवर्क सुरू आहे ते आता म्हणताय की हे बंद करू. मी अनेक आमदारांची नावे देऊ शकतो जे लोकं मटके, दारूचे व्यवसाय करतात. हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. विक्रेत्याला अटक केली पण पोशिंद्याला पकडत नाही. ते कोणालाही सोडू नका म्हणतात. मृताच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत करा संजय राऊत म्हणाले की, हे सरकार अवैध धंदे करणाऱ्यांच्या आणि गुंडाच्या भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे असे सांगते. काही झाले तर एक वाक्य मुख्यमंत्री म्हणतात आम्ही कोणालाही सोडणार नाही. ज्या लोकांचा काल बळी गेला त्यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये मदत करा, त्यामध्ये बहुतेक जण हिंदूच आहेत. आम्ही टीका केली की मग सरकारला मिर्च्या झोंबतात. मग त्यांचे लोकं समर्थन करायला पुढे येतात की विषारी दारू पिणे कसे योग्य आहे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. सरकारचे केवळ विधान परिषदेवर लक्ष संजय राऊत म्हणाले की, राज्यात दारू बंदी नाही. पण वर्ध्यात नदीच्या काठी भट्या आहेत. तो गांधीजींच्या आश्रमाच्या नावाने जिल्हा ओळखला जातो तिथे मुख्यमंत्र्यांनी जाऊन पहावे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील मोठ्या शहरात ड्रग्जची विक्री होत आहे, लोकं मरताय, खून होताय, बलात्कार होताय तरी सरकारचे लक्ष हे निवडणुकीकडे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed