पुणे विमानतळावर विमानात बॉम्ब धमकीची चिठ्ठी:गुवाहाटीला जाणाऱ्या विमानात सापडली, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

0
9c37ac48-3b07-46f6-8b28-b44d679ac8e5_1780119874528.jpg




पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर गुवाहाटीला जाणाऱ्या विमानातील प्रसाधनगृहात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारी चिठ्ठी सापडली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विमानतळावरील अधिकारी विशालकुमार श्रीवास्तव (वय 30) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी (29 मे) सकाळी पावणेसातच्या सुमारास गुवाहाटीला जाणाऱ्या विमानाची नियमित तपासणी करण्यात आली. विमानातील प्रसाधनगृहाची तपासणी करण्यात आली. तेव्हा प्रसाधनगृहात एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीवर ठळक अक्षरात बॉम्ब असे लिहिले होते. त्यानंतर त्वरीत सुरक्षा यंत्रणांनी विमानाची तपासणी केली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. तपासणीत विमानातील प्रसाधनृहात बॉम्बसदृश वस्तू सापडली नाही. या घटनेमुळे गुवाहाटीला जाणाऱ्या विमनास काही काळ विलंब झाला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक एस गुंड पुढील तपास करत आहेत. वडगाव शेरीत घरफोडी अडीच लाखांचे दागिने चोरी भरदिवसा घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख 60 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वडगाव शेरीतील साईनाथनगर भागात राहायला आहेत. 28 मे रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास तक्रारदार आणि कुटुबीय हे कामानिमित्त बाहेर पडले. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी दोन लाख 60 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. तक्रारदार सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरी परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलिस उपनिरीक्षक नरवडे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed