Central Railway | रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! ‘तो’ धक्कादायक निर्णय केला रद्द
Central Railway | मध्य रेल्वे (Central Railway) प्रशासनाने रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या दरवाढीबाबत घेतलेला निर्णय अचानक स्थगित केला आहे. 1 जून 2026 पासून वडापावसह विविध खाद्यपदार्थ महाग होणार होते. मात्र प्रवाशांकडून वाढता विरोध आणि नाराजी लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय पुढील आदेश येईपर्यंत लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील ‘मायनर स्टॅटिक कॅटरिंग युनिट्स’मध्ये विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दरात वाढ करण्याचे नियोजन करण्यात आले होते. 25 मे 2026 रोजी रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार 1 जूनपासून नवीन दर लागू होणार होते. विशेषतः स्थानकांवर मिळणारा वडापाव 13 रुपयांवरून थेट 20 रुपयांना जाणार असल्याची चर्चा होती.
मात्र हा निर्णय स्थगित झाल्यामुळे प्रवाशांना आता जुन्याच दरात खाद्यपदार्थ मिळणार आहेत. त्यामुळे मुंबई (Mumbai) आणि उपनगरांमधून रेल्वेने रोज प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वडापाव हा रेल्वे प्रवाशांचा सर्वाधिक लोकप्रिय आणि स्वस्त नाश्ता मानला जात असल्याने दरवाढीच्या बातमीने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
Central Railway | सर्व विभागांना तातडीच्या सूचना:
दरवाढीचा निर्णय स्थगित केल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने संबंधित सर्व विभागांना तातडीने आदेश जारी करण्यात आले. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत स्थानकांवरील स्टॉलवर जुन्याच दरांचे मेनूकार्ड आणि दरपत्रक कायम ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे 1 जूनपासून वाढीव दर आकारले जाणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाने सर्वसामान्य प्रवाशांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आधीच प्रवाशांवर आर्थिक ताण वाढला असताना खाद्यपदार्थांच्या प्रस्तावित दरवाढीमुळे नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे निर्णय मागे घेतल्याने रेल्वे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
