Pune Investment Project | पुण्यात ४०० कोटींची गुंतवणूक अन् ‘या’ क्षेत्राचा मोठा प्लॅन; CM फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा

0
Devendra-Fadanvis.webp.webp


Pune Investment Project | पुणे (Pune) जिल्ह्यात मोठ्या औद्योगिक गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासन आणि अग्रेको इंडिया (Aggreko India) कंपनी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे पुढील दहा वर्षांत सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून एक हजारांहून अधिक थेट रोजगार निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र सरकार कंपनीला आवश्यक सर्व प्रशासकीय सहकार्य देणार असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाला अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र (Lokesh Chandra), उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगण (Dr. P. Anbalagan), गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे (Kaustubh Dhavase) तसेच अग्रेको इंडिया (Aggreko India) कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या करारानुसार पुणे (Pune) जिल्ह्यातील फुलगाव येथे अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम याच वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे. स्कॉटलंड (Scotland) बाहेर अग्रेकोचे हे सर्वात महत्त्वाचे जागतिक उत्पादन केंद्र असणार असल्याचे सांगण्यात आले. राज्य सरकारकडून परवानग्या, मंजुरी, नोंदणी आणि इतर आवश्यक बाबींमध्ये मदत केली जाणार आहे.

Pune Investment Project | स्थानिक उद्योगांना मिळणार चालना :

अग्रेको इंडिया (Aggreko India) ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजनांच्या क्षेत्रात कार्यरत आहे. या प्रकल्पामुळे पुणे (Pune) परिसरातील स्थानिक पुरवठा साखळीला मोठी चालना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

ऊर्जा उपकरण निर्मिती, प्रिसिजन इंजिनिअरिंग आणि शाश्वत तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राची क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे, ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे आणि हवामान बदलांविरोधात उपाययोजना विकसित करण्यावर कंपनीचा भर असणार आहे. राज्याच्या हवामान बदल कृती आराखड्यालाही या प्रकल्पातून मदत मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

News title : Pune Investment Project 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed