मंजरपूर शिवारामधील खून प्रकरणामध्ये 5 जण अटकेत:डोळ्यात मिरची पावडर टाकून सख्खा चुलत भावानेच चाकूने भोसकले
![]()
मंजरपूर शिवारात जुन्या वहिवाट रस्त्यावरून दोन सख्ख्या चुलत भावांमध्ये शुक्रवारी वाद उफाळूनआला. या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले आणि एकाचाचाकूने भोसकून खून करण्यातआला. या प्रकरणी शिल्लेगावठाण्यात सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल असून, पाच आरोपींनाअटक केल्याची माहिती वरिष्ठनिरीक्षक सलीम चाऊस यांनी दिली. सतीश बोल्डे यांच्या तक्रारीनुसाररघुनाथ बोल्डे, सागर बोल्डे,शोभाबाई बोल्डे, दौलत बोल्डे,योगेश बोल्डे, सेजल कामठे, आरतीजाधव यांच्यावर गुन्हा दाखल आहे. आरोपींना सुनावली पोलिस कोठडी पाचही आरोपींना शनिवारी गंगापूरन्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने चार दिवसांची पोलीसकोठडी सुनावली आहे, अशीमाहिती पोलिस कर्मचारी हनुमंतसातपुते यांनी दिली. किसन बोल्डे यांच्या मृतदेहाचेसंभाजीनगर येथील घाटीरुग्णालयात शवविच्छेदन करूनशनिवारी दुपारी शिल्लेगाव येथीलशेतवस्तीवर पोलिस बंदोबस्तातअंत्यसंस्कार करण्यात आले. खुन प्रकरणातील मृतावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.
