रणगाड्यांचे माहेरघर आता दारूगोळा निर्मितीचे हब, वर्षभर युद्ध चालले तरी दारूगोळा पुरवण्याची प्रकल्पात क्षमता
![]()
ऐतिहासिक वारसा आणि लष्करी महत्त्वाचा केंद्रबिंदूअसलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याने संरक्षण उत्पादनक्षेत्रात नवा सुवर्ण इतिहास रचला आहे. १८ व्याशतकापासून सैन्याच्या हालचालींचे प्रमुख केंद्रराहिलेल्या या जिल्ह्याची ओळख आता देशाचे प्रमुख‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरर हब’ म्हणून अधोरेखित झालीआहे. शिर्डी येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते क्षेपणास्त्र संकुल व तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचेउद्घाटन करण्यात आले. यामुळे देशाची लष्करीसज्जता कमालीची वाढली आहे. या प्रकल्पाची क्षमता अत्यंत प्रभावी असून,उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठीमाहिती दिली. या प्रकल्पामुळे देशाला सलग ३६५ दिवसजरी युद्ध करावे लागले, तरी पुरेल इतका दारूगोळाआणि तोफगोळ्यांची निर्मिती करण्याची क्षमता आता आपल्याकडे निर्माण झाली आहे. हा प्रकल्प देशाच्या सुरक्षेसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. अहिल्यानगर, नाशिक, पुणे आणि नागपूर या चारशहरांचा समावेश असलेला ‘डिफेन्स कॉरिडोर’उभारण्याची मागणी राज्य सरकारने केली होती, ज्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. हा कॉरिडोर आताअंतिम टप्प्यात असून, यामध्ये ५ हजार कोटी रुपयांचीमोठी गुंतवणूक होणार आहे. उद्योगांसाठी आवश्यकती सर्व जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्रीउदय सामंत आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिलेआहे. येथे दिले जाते रणगाड्यांचे प्रगत प्रशिक्षण अहिल्यानगरमधील हे केंद्र आशियातील सर्वात जुन्याआणि मोठ्या रणगाडा प्रशिक्षण संस्थांपैकी एकआहे. येथे भारतीय लष्कराच्या चिलखती दलातीलअधिकारी आणि जवानांना रणगाड्यांचे तांत्रिकज्ञान, त्यांची देखभाल आणि रणधुमाळीतीलरणनीती याचे प्रगत प्रशिक्षण दिले जाते. भारतीयसैन्यातील अर्जुन, टी-७२ आणि टी-९० सारख्याअत्याधुनिक रणगाड्यांच्या प्रशिक्षणात या केंद्राचीभूमिका अत्यंत महत्वाची मानला जाते. संरक्षण सामर्थ्याचे आकर्षण; प्रदर्शनपाहण्यासाठी २० हजारांवर नागरिकांची गर्दी शिर्डी येथे आयोजित संरक्षण उद्योग प्रदर्शनात क्षेपणास्त्रांपासुन ते आधुनिकसंरक्षण उपकरणांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. संरक्षण दलाशी संबंधितसुमारे १०० एमएसएमई उद्योगांचे स्टॉल या प्रदर्शनात होते. दिवसभर नागरिक,विद्यार्थी आणि युवक यांनी स्वदेशी शस्त्रनिर्मितीचा हा थरार पाहण्यासाठी गर्दीकेली होती. सुमारे २० हजारांहून अधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. “भुईकोट”पासून सुरू
झाला लष्करी वारसा अहिल्यानगर जिल्हा हा भारतीयसैन्याच्या ‘आर्मर्ड कॉर्पस्’चे(रणगाडा दल) माहेरघर मानलाजातो. येथील ‘आर्मर्ड कोअर सेंटरअँड स्कूल’ हे रणगाडा हाताळणीआणि युद्धनितीचे आशियातीलसर्वात जुने आणि मोठे मुख्यप्रशिक्षण केंद्र आहे.भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्यामध्यवर्ती भागात असल्याने,पुण्यातील ‘सदर्न कमांड’शीजिल्ह्याचा समन्वय राखणे सोयीचेठरते. ऐतिहासिक भुईकोटकिल्ल्यापासून सुरू झालेला हालष्करी वारसा आता अत्याधुनिकसंरक्षण उत्पादनांच्या निर्मितीनेअधिक समृद्ध झाला आहे.
