Maharashtra Rain Alert | हवामानासंदर्भात सर्वात मोठं संकट! सरकारने दिला ‘हा’ गंभीर इशारा
Maharashtra Rain Alert | राज्यात खरीप हंगामाची तयारी सुरू असतानाच यंदाच्या पावसाबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हवामान खात्याच्या अंदाजाचा हवाला देत यंदा एल निनो (El Nino) चा प्रभाव राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तयारीचा आढावा घेतला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंदाच्या मान्सूनबाबत महत्त्वाची माहिती दिली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील दीर्घकालीन सरासरी पाऊस सुमारे 88 टक्के राहू शकतो. मात्र सर्व भागांमध्ये पावसाचे प्रमाण समान राहणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विशेषतः पश्चिम विदर्भ (West Vidarbha), मराठवाडा (Marathwada) आणि उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) या भागांमध्ये एल निनोचा प्रभाव अधिक तीव्र असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांतील शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन करताना अतिरिक्त काळजी घ्यावी लागणार आहे.
सरकारने हवामानाच्या अंदाजानुसार खरीप हंगामाचे नियोजन कसे करावे, यावर संबंधित विभागांसोबत चर्चा केली असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. पावसाचे प्रमाण कमी राहण्याबरोबरच पावसाच्या कालावधीत मोठे अंतर पडण्याची शक्यता असल्याने पिकांवर ताण येऊ शकतो, अशीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
Maharashtra Rain Alert | जलयुक्त शिवार कामांना गती देण्याचे आदेश :
मुख्यमंत्री फडणवीस (Devendra fadanvis) यांनी सांगितले की, यंदा जून महिन्यात तुलनेने अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर जुलैमध्ये पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते आणि ऑगस्ट तसेच सप्टेंबरमध्ये आणखी घट होण्याचा अंदाज आहे. पावसाच्या दोन सरींमध्ये मोठे अंतर पडल्यास पिकांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे जलसंधारण आणि पाणीसाठा वाढवण्याच्या उपाययोजनांवर भर देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
यासाठी जलयुक्त शिवार (Jalyukt Shivar) योजनेची कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र नियोजन तयार करण्यास सांगण्यात आले आहे. फडणवीस यांनी 2015 मधील एल निनो वर्षाचा उल्लेख करत त्या काळात मराठवाड्यात केवळ 61 टक्के पाऊस झाला होता, असे सांगितले. भविष्यात अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करता याव्यात यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
