Post Office Scheme | गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! 2 लाखांवर मिळतंय 90 हजार व्याज

0
Post-Office-Scheme.webp.webp


Post Office Scheme | सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधणाऱ्या नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस (Post Office) ची टाइम डिपॉझिट स्कीम (Time Deposit Scheme) आकर्षणाचा विषय ठरत आहे. म्युच्युअल फंड आणि एसआयपीसारखे पर्याय लोकप्रिय असले तरी जोखीम टाळून हमखास परतावा मिळवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांचा कल सरकारी योजनांकडे वाढत आहे. अशाच योजनांपैकी पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट योजना सध्या चर्चेत आली आहे.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवलेला पैसा पूर्णपणे सुरक्षित मानला जातो, कारण या योजनेला केंद्र सरकारची हमी असते. यामध्ये गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदरासह करसवलतीचाही लाभ मिळतो. अनेक सरकारी बँकांच्या एफडीपेक्षा या योजनेत अधिक व्याज दिले जात असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात या योजनेकडे वळताना दिसत आहेत.

या योजनेत वेगवेगळ्या कालावधीसाठी स्वतंत्र व्याजदर लागू आहेत. एका वर्षासाठी 6.9 टक्के, दोन आणि तीन वर्षांसाठी 7 टक्के, तर पाच वर्षांच्या गुंतवणुकीवर 7.5 टक्के वार्षिक व्याज दिले जाते. विशेष म्हणजे पाच वर्षांचा पर्याय निवडल्यास सर्वाधिक परतावा मिळतो. या योजनेत फक्त 1 हजार रुपयांपासून खाते सुरू करता येते आणि गुंतवणुकीवर कोणतीही कमाल मर्यादा नाही. तसेच 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावानेही खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Post Office Scheme | 2 लाखांवर मिळणार तब्बल 90 हजार व्याज :

या योजनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे दीर्घकालीन गुंतवणुकीवर मिळणारा मोठा परतावा. एखाद्या व्यक्तीने पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये 5 वर्षांसाठी 2 लाख रुपये जमा केले, तर 7.5 टक्के व्याजदरानुसार मुदतपूर्तीवेळी जवळपास 2 लाख 89 हजार 990 रुपये मिळतात. म्हणजेच केवळ व्याजाच्या स्वरूपात सुमारे 89 हजार 990 रुपयांची कमाई होते.

या स्कीममध्ये सिंगल आणि जॉइंट अशा दोन्ही प्रकारची खाती सुरू करता येतात. व्याजाची रक्कम दरवर्षी जोडली जाते. मात्र खाते सुरू झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत पैसे काढण्याची परवानगी नसते. मुदतपूर्व रक्कम काढल्यास 1 टक्क्यांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. याशिवाय आयकर कायदा कलम 80C अंतर्गत करसवलतीचाही लाभ मिळतो. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक आणि स्थिर परतावा शोधणाऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर मानली जात आहे.

News title : Post Office Time Deposit Benefits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed