Hardik Pandya | हार्दिक पंड्याच टेन्शन वाढलं! BCCI ने केली मोठी कारवाई

0
sayali-web-86.webp.webp


Hardik Pandya | आयपीएल 2026 (IPL 2026) मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची निराशाजनक कामगिरी सुरू असतानाच कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्यावर बीसीसीआय (BCCI) ने कारवाई केली आहे. कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्धच्या सामन्यात मैदानावरील वर्तनामुळे हार्दिकला दंड ठोठावण्यात आला असून त्याच्या मॅच फीमधून 10 टक्के रक्कम कपात करण्यात आली आहे.

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे संघाच्या स्पर्धेतील स्थितीवर फारसा परिणाम झाला नसला तरी प्रतिष्ठेच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा मानला जात होता. मात्र सामना सुरू असताना हार्दिक पंड्याकडून घडलेल्या एका कृतीमुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

कोलकाता नाइट रायडर्सच्या डावातील दहाव्या षटकात ही घटना घडली. चौथ्या चेंडूवेळी गोलंदाजीसाठी धावत येताना हार्दिकने स्टम्पवरील बेल्स खाली पाडत आपला राग व्यक्त केला. या प्रकारामुळे त्याच्यावर आयपीएलच्या आचारसंहितेतील कलम 2.2 चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला. सामना रेफरी राजीव सेठ (Rajeev Seth) यांच्यासमोर हार्दिकने आपली चूक मान्य केली. त्यामुळे पुढील सुनावणीची आवश्यकता भासली नाही आणि त्याला आर्थिक दंड सुनावण्यात आला.

Hardik Pandya | फलंदाजीतही निराशाजनक प्रदर्शन :

या सामन्यात हार्दिक पंड्याची फलंदाजीही अपेक्षेप्रमाणे झाली नाही. मुंबई इंडियन्सकडून तो दुसऱ्या क्रमांकाचा धावसंख्या करणारा फलंदाज ठरला असला तरी त्याची खेळी संथ राहिली. त्याने 27 चेंडूंमध्ये 26 धावा केल्या. त्याच्या खेळीत एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. टी-20 क्रिकेटच्या वेगवान फॉरमॅटनुसार ही खेळी प्रभावी मानली जात नाही.

गोलंदाजीतही हार्दिकला विशेष यश मिळाले नाही. त्याने दोन षटके टाकून 13 धावा दिल्या, मात्र एकही विकेट घेता आली नाही. आयपीएल 2026 मधील हा त्याचा नववा सामना होता. या हंगामात हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने केवळ दोन सामने जिंकले आहेत. आतापर्यंतच्या 9 सामन्यांत त्याने 172 धावा केल्या असून 4 विकेट्सही घेतल्या आहेत. मात्र संघाच्या खराब कामगिरीमुळे हार्दिकवर सातत्याने टीका होताना दिसत आहे.

News title : Hardik Pandya Fined By BCCI

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *