Oppo Find X9 Ultra | Oppo चे दोन स्मार्टफोन भारतात लाँच! जाणून घ्या फीचर्स

0
Oppo.webp.webp


Oppo Find X9 Ultra | स्मार्टफोन बाजारात Oppo कंपनीने मोठी एंट्री करत Oppo Find X9 Ultra आणि Oppo Find X9s हे दोन नवे प्रीमियम स्मार्टफोन्स भारतात सादर केले आहेत. दमदार कॅमेरा, मोठी बॅटरी आणि अत्याधुनिक प्रोसेसरमुळे हे दोन्ही फोन चर्चेत आले आहेत. प्रीमियम अँड्रॉइड सेगमेंटमध्ये Vivo आणि Samsung सारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी Oppo ने या मालिकेत अनेक प्रगत फीचर्स दिले आहेत.

Oppo Find X9s हा फ्लॅगशिप अनुभव कमी किंमतीत देण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.59 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून तो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये फ्लॅट-एज डिझाइन आणि चौकोनी कॅमेरा मॉड्यूल देण्यात आले आहे. परफॉर्मन्ससाठी MediaTek Dimensity 9500s प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 12GB LPDDR5X RAM आणि 512GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजचा पर्याय मिळतो. बॅटरी विभागात 7,025mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली असून ती 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मात्र वायरलेस चार्जिंगची सुविधा उपलब्ध नाही. फोटोग्राफीसाठी Hasselblad ट्युनिंगसह ट्रिपल 50MP रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा मिळतो. हा फोन Android 16 आधारित ColorOS 16 वर चालतो.

Midnight Grey, Sunset Orange आणि Lavender Sky या रंगांमध्ये तो उपलब्ध होणार आहे. 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 79,999 रुपये ठेवण्यात आली असून 512GB मॉडेलची किंमत सुमारे 89,999 रुपये असू शकते.

Oppo Find X9 Ultra | Find X9 Ultra मध्ये प्रीमियम फीचर्स :

Oppo Find X9 Ultra हा कंपनीचा सर्वात प्रीमियम स्मार्टफोन मानला जात आहे. या डिव्हाइसमध्ये 6.82 इंचाचा QHD+ LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून त्याला 120Hz रिफ्रेश रेट, 10-bit कलर डेप्थ आणि 1,800 nits पर्यंत पीक ब्राइटनेसचा सपोर्ट आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर, 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज दिले आहे. गेमिंगसाठी Adreno 840 GPU चा समावेश करण्यात आला आहे.

कॅमेरा हा या फोनचा सर्वात मोठा आकर्षणबिंदू ठरत आहे. यात OIS सपोर्टसह 200MP प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड लेन्स, 200MP टेलिफोटो लेन्स आणि 50MP अल्ट्रा-टेलिफोटो सेन्सर देण्यात आला आहे. 10x ऑप्टिकल झूम आणि 120x डिजिटल झूमचा सपोर्टही यात मिळतो. व्हिडिओ शूटिंगसाठी 8K 30fps, 4K 120fps, Dolby Vision, Hasselblad मोड आणि XPAN सारखी प्रगत फीचर्स उपलब्ध आहेत. सेल्फीसाठी 50MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.या फोनमध्ये 7,050mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरी देण्यात आली असून ती 100W SuperVOOC वायर्ड आणि 50W AirVOOC वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

News title : Oppo Find X9 Ultra India Launch

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *