Farmer Loan Waiver | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबत केली सर्वात मोठी घोषणा
Farmer Loan Waiver | राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कर्जमाफीबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घेतली असून, येत्या 30 जूनपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत शेतकरी आणि बँकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. विरोधकांकडूनही या मुद्द्यावरून सरकारवर सातत्याने टीका केली जात होती. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीची अंतिम मुदत जाहीर करत प्रशासन आणि बँकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. कर्जमाफीची माहिती कोणत्या स्वरूपात द्यायची, याचे नियोजन पूर्ण झाले असून यासंदर्भात बँकांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, कर्जवाटप आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. अनेक बँका 80 टक्के कर्जवितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित बँकांना तत्काळ लक्ष्य पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शेती कर्ज देताना शेतकऱ्यांकडून सीबील स्कोअर (CIBIL Score) मागू नये आणि कर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण करू नये, असे स्पष्ट निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत.
Farmer Loan Waiver | एल निनो संकटामुळे सरकार सतर्क :
यंदाच्या खरीप हंगामावर एल निनो (El Nino) चा प्रभाव राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात सरासरी 88 टक्के पाऊस होण्याचा अंदाज असून पावसाचे प्रमाण उतरत्या क्रमाने कमी होऊ शकते, अशी माहितीही समोर आली आहे.
र्भ (West Vidarbha), मराठवाडा (Marathwada) आणि उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) या भागांमध्ये याचा अधिक परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे पाण्याची उपलब्धता कायम राहावी यासाठी जलयुक्त शिवार (Jalyukt Shivar) आणि जलसंधारण प्रकल्पांना गती देण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
