महिलांनी आत्मरक्षणासाठी दुर्गा बनणे काळाची गरज:प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या काजल हिंदुस्थानी यांचे मत‎

0
240_17789321896a0859ddb1435_darapurkajal.jpg




महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसवण्यासाठी आणि स्वसंरक्षण करण्यासाठी महिलांना दुर्गा बनणे काळाची गरज आहे. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा, भ्रमणध्वनीच्या अति वापरापासून स्वतः आणि आपल्या पाल्यांना देखील दूर ठेवा. अनोळखी व्यक्तीला सामाजिक माध्यमांवर मित्र बनवू नका, असे आवाहन सुप्रसिद्ध प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या काजल हिंदुस्थानी यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या नावाने स्थापन झालेल्या गोपाल अरबट मित्र परिवाराच्यावतीने बसस्थानकासमोरील कन्या शाळेत हिंदू जागरण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोर्शीच्या नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून अंजनगाव सुर्जीचे नगराध्यक्ष अविनाश गायगोले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील डिके, सहसंपर्क प्रमुख गजानन वाकोडे, रवींद्र गणोरकर, अरुणा इंगोले, जयश्री खातखीडे, वंदना दारवेकर, मदत कक्षाच्या सोनाली देशमुख, तालुकाप्रमुख छाया निचळ, मीनाक्षी कपले, डॉ. भावना भुतडा, भारतीय जनता पार्टीच्या मेघा भारती, प्रगती पोटे, वर्षा उफाळे, विद्याताई अरबट, अपर्णा मालठाने, प्रा‌. प्रणिता बिजवे, वृंदा मुक्तेवार, भाग्यश्री सगणे, प्रीती उमाळे, डॉ.दिनेश म्हाला इत्यादी मंडळी उपस्थित होती. काजल हिंदुस्थानी पुढे बोलतांना म्हणाल्या की गेल्या अनेक दिवसापासून देशात व महाराष्ट्रात लव्ह जिहाद, लँड जिहादच्या घटना वाढत आहेत. हिंदू जागरण, तयारीसाठी बैठका सध्या सर्वत्र हिंदू जनजागरण सभांचे आयोजन केले जात आहे. या क्रमात अमरावतीच्या दसरा मैदान येथे आगामी ७ जुन रोजी ऐतिहासिक हिंदू जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसार प्रचार संदर्भातील हिंदुत्वनिष्ठांची पहिली बैठक भक्तिधाम मंदिर ,साईनगर येथे पार पडली. या बैठकीला 35 विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा हुंकार घुमणार असून सभेचा संदेश घराघरात पोचवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed