मुळशीत भीषण अपघात:ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखांच्या फॉर्च्युनरची रिक्षाला जोरदार धडक; ऑटोचालकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी
![]()
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातून एक अत्यंत भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. चांदे-मूलखेड रस्त्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे यांच्या फॉर्च्युनर गाडीची आणि एका ऑटो रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, शिवसेना नेते प्रकाश भेगडे यांच्यासह फॉर्च्युनरमधील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे हे आपल्या फॉर्च्युनर गाडीतून चांदे-मूलखेड रस्त्यावरून जात असताना, समोरून येणाऱ्या रिक्षाशी त्यांच्या गाडीची अत्यंत भीषण धडक झाली. हा अपघात इतका भयानक होता की, दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या जोरदार धडकेमुळे रिक्षाचालक विकास अर्जुन पारखी यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रकाश भेगडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत या अपघातात फॉर्च्युनरमध्ये असलेले शिवसेना नेते प्रकाश भेगडे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. त्यांच्यासोबत गाडीत प्रवास करणारे इतर दोन प्रवासीही या अपघातात जखमी झाले आहेत. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे यांच्या अपघाताची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. फॉर्च्युनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल या प्रकरणी मृत रिक्षाचालकाचे नातेवाईक अभिमन्यू अर्जुन पारखी यांनी मुळशीतील पौड पोलिस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फॉर्च्युनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पौड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दोन्ही वाहनांची झालेली दुरवस्था पाहून अपघाताची तीव्रता किती भीषण होती, याचा अंदाज येतो. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, पौड पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हे ही वाचा… नाशिकच्या मालेगावात घटसर्प रोगामुळे दोन बालकांचा मृत्यू:नागरिकांमध्ये भीतीचे सावट, आरोग्य यंत्रणा हादरली गेल्या काही महिन्यांत वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आलेल्या नाशिक जिल्ह्यातून आता आरोग्य क्षेत्राला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालेगाव शहरात ‘घटसर्प’ या गंभीर आजाराने दोन निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. शासनाकडून हा आजार जवळपास हद्दपार (कालबाह्य) झाल्याचा दावा केला जात असताना आणि लसीकरणावर मोठा निधी खर्च होत असतानाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. लसीकरणानंतरही दोन बालकांचा मृत्यू झाल्याने स्थानिक आरोग्य यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर आणि कारभारावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सविस्तर वाचा…
