दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:कपाशी बियाणे पहिल्याच दिवशी संपले; नाइलाजास्तव अन्य खरेदी

0
24017789328036a085c43911aa16biane_1778987844.jpg




खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे विक्रीचा शुभारंभानंतर पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेले कपाशी बियाणे अजित-५ हे वाण संपल्याचे शनिवारी दिसून आले. शेतकऱ्यांनी सकाळीच अनेक कृषी केंद्रांवर धाव घेतली. मात्र त्यांना या बियाण्यांचा साठा संपल्याचे सांगण्यात आले. कृषी केंद्रांचे संचालक, तेथील कर्मचारी शेतकऱ्यांना अन्य बियाणे घेण्याचे सुचवत असल्याचे पहावयास मिळाले. मात्र शेतकरी त्याच वाणावर ठाम होते. काही वेळानंतरही सर्वाधिक पसंतीचे बियाणे मिळत नसल्याने काही शेतकरी उपलब्ध असलले अन्य बियाणे घेत घराकडे निघाले. आता एकाच दिवसात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक पसंतीचे २७ हजार ४८० पाकिट संपल्याने साठेबाजी, काळा बाजार तर होणार नाही, अशी धास्ती शेतकऱ्यांनी घेतल्याचेही त्यांच्या बोलण्यातून जाणवले. काही वर्षांपूर्वी कापूस बीटी बियाणे वाणावर गुलाबी अळीने हल्ला केल्याने उत्पादनात घट झाली होती. नुकसान भरपाईची एकूण रक्कम ८९ कोटी ५३ लाख ४१ हजार ३७४ रुपयापर्यंत पोहोचली होती. उर्वरित. पान ४ ^शेतकऱ्यांनी एकाच वििशष्ट बियाण्यासाठी आग्रह धरू नये. अन्य वाणांचाही विचार करावा. शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेल्या बियाण्यांच्या विक्री झालेल्या पावत्या तपासण्यात आल्या असून, अद्याप तरी गैरप्रकार आढळून आलेला नाही. लवकरच शेतकऱ्यांची पसंती असलेल्या बियाण्यांचा पुरवठा होईल. कृषी विभाग सतर्क आहे. डॉ. तुषार जाधव, जिल्हा कृषी विकास अधिकारी, अकोला. यंदा मान्सूनवर अल निनोचे सावट आहे. पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे. अजित ५ या व्हेरायटीत ताण सहनची क्षमता सर्वाधिक आहे. अनेकांना तर प्रती एकर १० क्विंटल उत्पादन मिळाले होते. अल-निनोमुळे समुद्राचे पाणी असामान्यपणे गरम होते. यंदा तर प्रशांत महासागरात ८ ते १० अंश सेल्सिअसने तापमान वाढले . परिणामी यंदा १२ महिन्यांपर्यंतही दुष्काळी स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे-खत खरेदी फार घाई करू नये. प्रशांत गावंडे, कृषी अर्थतज्ज्ञ तथा संयोजक बियाणे सर्वांना मिळेल उपलब्ध बियाण्यांचा तपशील असा अजित सीड्स या कंपनीकडून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात एकूण ९३,४०० कापूस बियाणे पाकिटांचा पुरवठा करण्यात आला होता. यात अजित ५- २७४८०, अजित- १५५ – ५७२००, अजित ९००- ५७६०, अजित ११९९- २९६० पाकिटांंचा समावेश होता. पहिल्याच दिवशी अजित ५ ची पाकिटे संपली. बियाण्यांचा काळाबाजार, लिंकिंग (शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या बियाण्यांसोबत त्यांना आवश्यकता नसतानाही अन्य बियाणे विकत घेण्यास भाग पाडणे)सारखे गैरप्रकार यापूर्वी घडले होते. यंदाही हे गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. आता पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती असलेले पहिल्या लॉटमधील बियाणे संपल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed