संघर्षातून उभं राहिलेलं व्यक्तिमत्त्व… अनेकांच्या आयुष्याला दिली नवी दिशा!
Oplus_131072
संघर्षातून उभं राहिलेलं व्यक्तिमत्त्व… अनेकांच्या आयुष्याला दिली नवी दिशा!
नांदेड शहरात शिक्षण क्षेत्रात आपल्या गुणवत्तेच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणारे केमिस्ट्रीचे गोल्ड मेडलिस्ट प्रा. शिवराज मोटेगावकर सर हे आज हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. मात्र केवळ शिक्षणापुरतंच त्यांचं कार्य मर्यादित नसून, समाजातील अनेक लहान व्यवसाय, संस्था आणि नवउद्योजकांना उभं करण्यामध्येही त्यांचा मोठा वाटा असल्याचं दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, नांदेडमधील लोकप्रिय वेब रेडिओ प्लॅटफॉर्म Radio24 ला सुरुवातीपासूनच मोटेगावकर सरांनी भक्कम पाठबळ दिलं. रेडिओ क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत असताना सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि मानसिक आधार देत Radio24 ला उभं राहण्यासाठी मोठी मदत केली.
Radio24 परिवारातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना अत्यंत बोलक्या आहेत. “आज आम्ही रेडिओ क्षेत्रात आत्मविश्वासाने काम करत आहोत, त्यामागे मोटेगावकर सरांचा मोठा वाटा आहे. त्यांनी फक्त आमचाच नाही तर अनेक छोट्या संस्था, व्यवसाय आणि नव्या लोकांना उभं राहण्यासाठी हात दिला,” अशी भावना Radio24 टीमने व्यक्त केली.
समाजात अनेक यशस्वी व्यक्ती असतात, पण दुसऱ्यांच्या यशात आनंद मानणारी माणसं फार कमी असतात. प्रा. शिवराज मोटेगावकर सर हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक मानले जातात. अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यामागे त्यांचा सहभाग असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
शिक्षण, समाजकार्य, मार्गदर्शन आणि नव्या पिढीला उभं करण्याची जिद्द यामुळे मोटेगावकर सर हे केवळ शिक्षक नसून अनेकांसाठी आधारवड बनले आहेत. संघर्ष करणाऱ्यांना साथ देणारी अशी व्यक्तिमत्त्वे समाजासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरत आहेत.
