मनमाडला रेल्वेच्या पूर्व नियोजित बैठकीला डी. आर. एम. ची दांडी:खासदार भगरे संतप्त, रेल्वे बुकात केली लेखी तक्रार, गोदावरी एक्सप्रेससह भूसंपादनाचा प्रश्न अधांतरी‎

0
app_17788388066a06ed16cf970_1343054.jpg



मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत सुरू करणे, रेल्वे भूसंपादन आणि प्रवाशांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मनमाड जंक्शन येथे आयोजित केलेली महत्त्वपूर्ण बैठक रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रद्द करण्यात आली. भुसावळ विभागाचे विभागीय र

.

यावेळी संतप्त नागरिक, व्यापारी आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत बैठकीतून वॉकआऊट केले.

खासदार भगरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, गोदावरी एक्सप्रेस ही नाशिक जिल्ह्याची जीवनदायिनी आहे. कोरोना काळापासून बंद असलेली ही गाडी सुरू करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासन दखल घेत नाही. मनमाड, लासलगाव, निफाड आणि नाशिकमधील प्रवासी आजही त्रस्त आहेत. धुळे-मुंबई गाडीत जागा मिळत नाही. इतक्या गंभीर समस्या असताना स्वतः वेळ देऊनही डीआरएम बैठकीला न येणे, हा जनतेचा आणि लोकप्रतिनिधीचा अपमान आहे.

यावेळी रेल्वे अधिकारी किशोर सिंग, योगेश गरड, डी. एम. शुक्ल, डी. बी. तपास्वी यांच्यासह ॲड. सुधाकर मोरे, महेंद्र बोरसे, गणेश धात्रक, सुनील पाटील, अशोक व्यवहारे, अजय खरोटे, कृष्णा पगारे, राजाभाऊ पारिक, एस. एम. भाले, नरेंद्र कांबळे, झुंजार भारमल, कल्पेश बेदमुथा व मोठ्या संख्येने नागरिरेल्वेकडून सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे.

या प्रक्रियेतील त्रुटी आणि प्रलंबित अडचणींवर चर्चा होणे अपेक्षित होते; मात्र जबाबदार अधिकारी गैरहजर राहिल्याने हे सर्व प्रश्न पुन्हा अधांतरी राहिले आहेत.

या प्रकाराची चौकशी व्हावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी आपण थेट रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचेही खासदारांनी जाहीर केले.रेल्वे प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे मनमाडसह संपूर्ण जिल्हयातील रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed