आरापूरजवळ आयशरची उभ्या टेम्पोला धडक:2 जागीच ठार, 2 गंभीर जखमी, आयशर चालक घटनास्थळावरून फरार, जखमींवर संभाजीनगरला उपचार सुरू
![]()
लासूर स्टेशन रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या डीजेच्या टेम्पोला भरधाव आयशरने पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात २ जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर मार्गावरील आरापूर श
.
राहुल दिलीप राठोड (२१, रा. कुंभेफळ), गोविंद पुंडलिक तनपुरे (३०, रा. जळगाव ता. छत्रपती संभाजीनगर) अशी मृतांची नावे आहेत. शिल्लेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीनगरवरून एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी डीजेचा टेम्पो हा वैजापूरकडे जात असताना आरापूर शिवारात लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला डीजे टेम्पो (एमएच ०४ एफडी ८१०४) चालकाने उभा केला.
यावेळी शेंद्रावरून डोंबिवलीकडे मालवाहतूक करणारा आयशर (एमएच २० ईएल १७७९) ने डीजेच्या टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये डीजे हा रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने अपघातात राहुल दिलीप राठोड, गोविंद पुंडलिक तनपुरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहे. दरम्यान, अपघातानंतर आयशर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
डीजेला मिळाली सुपारी संभाजीनगरवरून एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी डीजेचा टेम्पो हा वैजापूरकडे जात होता. लघुशंकेसाठी चालकाने टेम्पो आरापूर शिवारात उभा केला. मात्र, त्याचवेळी भरधाव आयशरने टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिली. यात टेम्पोमधील दोघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी आहेत.
