15 हजारांची लाच स्विकारणारा शिपाई पोलीस कोठडीत – VastavNEWSLive.com

[ads1]

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड भुमि अभिलेख कार्यालयात काल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 15 हजार रुपयांची लाच स्विकारणार्‍या शिफायास पकडले होते. आज न्यायालयाने त्यास पोलीस कोठडीत पाठविले आहे.
शेतजमीनीच्या मोजणीचा अहवाल न्यायालयात पाठविण्यासाठी भुमि अभिलेख कार्यालय मुखेड येथील निमतानदार 15 हजार रुपयांची लाच मागणी करत होता. पण ही लाच कार्यालयातील शिफाई विवेकानंद पांडूरंग खुडेने स्विकारली. या प्रकरणातील निमतानदार सय्यद इमरान सय्यद इकबाल विरुध्द सुध्दा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. परंतू आज मुखेड न्यायालयाने पकडून आणलेला विवेकानंद हा शिपाई पाहुन आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरिक्षक प्रिती जाधव यांनी सादर केलेल्या निवेदनानुसार एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.


Post Views: 4






[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *